Lok Sabha Election 2024: लोकशाहीच्‍या उत्सवासाठी 'गोवा' सज्ज; मतदान केंद्रे सजली; कडक बंदोबस्तात पार पडणार मतदान

Lok Sabha Election 2024: जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही देशातील लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात आज (मंगळवारी) मतदान होत आहे.
Goa Lok Sabha Election 2024
Goa Lok Sabha Election 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024: जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही देशातील लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात आज (मंगळवारी) मतदान होत आहे. राज्यात एकूण १७२५ मतदानकेंद्रे असून, लोकशाहीच्या उत्सवासाठी गोवा सज्ज बनला आहे. निवडणूक आयोगाद्वारे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदान करण्यासाठी घराबाहेर पडावे यासाठी सर्व प्रकारचे उपाय योजले आहेत. दरम्‍यान, मतदारांना उकाड्यापासून दिलासा मिळावा म्‍हणून प्रत्‍येक मतदानकेंद्रावर सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत शितपेय, लिंबू पाणी देण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे.

कडक सुरक्षेसह ईव्‍हीएम तसेच इतर उपकरणे प्रत्येक मतदानकेंद्रावर रवाना झाली आहेत. तिसवाडी तालुक्यातील मतदानयंत्रे तसेच इतर उपकरणे डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवरून अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली. निवडणूक अधिकाऱ्यांना सकाळी ९ वाजता उपकरणे नेण्यासाठी बोलाविण्यात आले होते. दुपारी सव्‍वादोनच्या सुमारास सर्व सोपस्कार पूर्ण करून ईव्हीएम यंत्रे कर्मचऱ्यांकडे सुपूर्द करण्‍यात आली. लोकशाहीच्‍या (Democracy) उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी पिंक बूथ, दिव्यांग बूथ तसेच बहुतांश मतदानकेंद्रांवर सजावट करण्यात आली आहे.

Goa Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024: गोव्यातील दोन लोकसभा जागांसाठी आज मतदान; 16 उमेदवारांचे भवितव्‍य मतदारांच्‍या हाती

मतदान केंद्रावरील कर्मचारी उपाशी

सांगे वितरण केंद्रावर कर्मचाऱ्यांना सकाळी ९.३० वाजता यायला सांगितले होते. मात्र, केंद्रावर सुविधांची उणीव दिसून आली, पाणी पिण्यासाठी ग्लास नव्हते. जेवणासाठी रांगेत उभे राहिलेल्या केवळ पहिल्या वीस लोकांनाच जेवण मिळाले. उरलेल्या लोकांना डाळ भातावर समाधान मानावे लागले. दरम्यान, ते देखील अर्ध्या तासांत संपले.

Goa Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024: ''राज्यात आरोग्य सुविधा निर्माण करण्यात सावंत सरकार फेल ठरलं''; इंडिया आघाडीचा घणाघात

हरित निवडणूक

निवडणूक आयोगाने (Election Commission) यंदा ‘हरित निवडणूक’ करण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व मतदानकेंद्रांवर आरोग्यवर्धक तसेच फळांच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. प्रत्येक मतदानकेंद्रावर प्रत्येकी पाच झाडांची लागवड करण्यात आली आहे.

ताळगावात वेगळी व्यवस्था

ताळगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अलीकडेच मतदान झाले असून मतदारांच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटाला शाई लावण्यात आली होती. आता लोकसभा निवडणुकीत या मतदारांच्या तर्जनीला शाई लावण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com