Margao: मडगाव पोलिस स्टेशन समोरच स्वत:ला भोकसले, परप्रांतीय व्यक्ती गंभीर जखमी

Margao Police: सोमवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली, जखमीवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Margao Police Station
Margao Police StationDainik Gomantak

Margao Police

मडगाव पोलिस स्थानकासोरच स्वत:ला भोकसून घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. जखमी व्यक्ती परप्रांतीय असल्याची माहिती समोर आली असून, तो गंभीर जखमी झाला आहे. सोमवारी (दि.06) सकाळी मडगाव पोलिस स्थानकासमोरच हा प्रकार घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यम वयस्कर परप्रांतीय व्यक्तीने काचेच्या बाटलीच्या स्वत:लाच भोकसून घेत जखमी केले. मडगाव पोलिस स्थानकासमोर सकाळच्यावेळेस हा प्रकार घडला. संबधित व्यक्तीने पोटात जखम झाल्याने व्यक्तीला उपचारासाठी तात्काळ दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी व्यक्तीने सोडा बॉटल फोडून उरलेल्या काचेच्या मदतीने पोटावर वार केला. जखमी व्यक्तीची मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याची माहिती समोर आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com