Goa Crime: बोटमालकाचा खून करून मृतदेह फेकला समुद्रात? वास्‍कोत खळबळ, संशयाची सुई कामगारांकडे

Khariwada jetty boat owner death: खारीवाडा जेटीवरून आपल्या कामगारांसह मासेमारीसाठी समुद्रात गेलेले बोटमालक मंजुनाथ हरिकांत यांचा मृतदेह आगशी परिसरातील झुआरी नदीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
Goa Crime
Goa CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: खारीवाडा जेटीवरून आपल्या कामगारांसह मासेमारीसाठी समुद्रात गेलेले बोटमालक मंजुनाथ हरिकांत यांचा मृतदेह आगशी परिसरातील झुआरी नदीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. बोटीवरील कामगारांनीच त्‍यांचा खून करून मृतदेह समुद्रात फेकला असावा, अशी चर्चा बोटमालकांमध्‍ये सुरू आहे.

मंजुनाथ हरिकांत हे गेल्या अनेक वर्षांपासून खारीवाडा येथे मासेमारी व्यवसाय करत होते. दोन दिवसांपूर्वी ते आपल्या कामगारांसह खोल समुद्रात मासेमारीसाठी गेले होते. मात्र काही तासांनंतर त्यांची बोट खारीवाडा जेटीवर परतली. बोटीवरील कामगार खाली उतरले; परंतु मंजुनाथ मात्र दिसून आले नाहीत.

दुसऱ्या दिवशी सकाळीही बोट जेटीवर तशीच उभी होती. बोटीत मासळी पडून असल्याने त्यावर पक्षी ताव मारत असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. मंजुनाथ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांचा मोबाईल बंद होता. त्यांच्या कामगारांचाही पत्ता नव्‍हता. त्यामुळे संशय अधिक बळावला.

Goa Crime
Goa land Zoning: 17 गावांतील सुमारे 2.01 कोटी चौरस मीटर जमीन 'NDZ'मध्‍ये; सूचना, हरकतींसाठी 30 दिवसांची मुदत; टीसीपीचा निर्णय

कामगार बेपत्ता

मंजुनाथ हरिकांत यांच्यासोबत मासेमारीसाठी गेलेले दोन कामगार बोट जेटीवर आणल्यानंतर अचानक बेपत्ता झाले आहेत. बोटीतून उतरून ते निघून गेले; मात्र त्यानंतर त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. बोटीवरील काही साहित्यही गायब आहे. त्यामुळे पोलिस तपासात या कामगारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

Goa Crime
Goa Monsoon: पावसाळापूर्व तयारी केवळ बैठकांपुरतीच

मंजुनाथ हरिकांत हे अत्यंत शांत आणि मनमिळाऊ होते. त्यांच्या मृत्यूमागील सत्य समोर येणे आवश्यक आहे. संपूर्ण घटनाक्रम संशयास्पद आहे. पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास करून सत्य जनतेसमोर आणावे.

- जुझे फिलिप डिसोझा, अध्यक्ष (ऑल गोवा फिशिंग बोट ओनर्स असोसिएशन)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com