Save Mhadei Save Goa : कर्नाटकच्या हितासाठी म्हादईचा बळी : विरियेतो फर्नांडिस

सांगेत बसस्थानकावरील जाहीर सभेत सरकारवर टीकास्त्र
public meeting at Sanguem
public meeting at SanguemDainik Gomantak

पाणी, वायू, जमीन हे जीवनाचे अविभाज्य भाग आहेत. पण सरकारला या तिन्ही घटकांचे रक्षण करता आलेले नाही. हे सरकार सामान्यांच्या हितासाठी नव्हे, तर उद्योजकांचे हित जपत आहे.

कर्नाटकातील उद्योजकांच्या हितासाठी म्हादईचा बळी देण्यासाठी सत्ताधारी भाजप सरकार आणि पक्ष कार्यरत आहे. त्यामुळे याविरोधात सर्वांनी भेदभाव विसरून एकत्र येण्याचे आवाहन कॅप्टन विरियेतो फर्नांडिस यांनी केले.

‘म्हादई वाचवा’ म्हणून गेले महिनाभर सांगेच्या काना-कोपऱ्यात बैठका घेऊन वातावरण निर्मिती केल्यानंतर या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आयोजित केलेल्या सांगे बस स्थानकावरील सभेला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

public meeting at Sanguem
Goa BJP : भाजपचे मुख्य कार्यालय कदंब पठारावर बांधणार : सदानंद शेट तानावडे

पर्यावरणप्रेमींनी उपस्थित राहून सभेला मार्गदर्शन केले. अभिजीत प्रभुदेसाई यांनी व्यासपीठावर तैलचित्र दाखवून उपस्थितांना मार्गदर्शन केले, तसेच सरकारवर सडकून टीकाही केली.

नगरसेवक मॅशू डिकॉस्ता म्हणाले की, आजही सांगेवासीयांना टँकरचे पाणी प्यावे लागते. उत्तर गोव्यात पाणीप्रश्न निर्माण झाल्यास दक्षिण गोव्यातील साळावली धरणाचे पाणी वळविले तर सांगेत भविष्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होणार आहे.

जयेश शेटगावकर म्हणाले, सरकारने कर्नाटक सरकारचे पैसे आणून कॉंग्रेसचे आठ आमदार विकत घेतले. सुशेगाद गोंयकार म्हणून जनतेला छळू नका. कोणताही विषय असो, गोव्यातील जनता एकत्र येणे गरजेचे आहेे, असे ते म्हणाले.

जितेंद्र नाईक म्हणाले की, म्हादई उत्तर गोव्यात असली तरी आज ना उद्या सांगेतील जनतेला परिणाम भोगावा लागणार आहे. यावेळी ओलेंसियो सिमोईस यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन जोस्टन फर्नांडिस यांनी केले. सभेला लोकांची मोठी उपस्थिती होती.

public meeting at Sanguem
Video: जपानचे पंतप्रधान 'फुमियो किशिदा' दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर

भावी पिढीसाठी गोवा वाचवा

फादर बोलमॅक्स परेरा म्हणाले की, गोव्यात न्याय्य हक्कासाठी जनतेला रस्त्यावर उतरावे लागते, हे दुर्दैव असून सुंदर गोव्याची भाजप सरकारने वाट लावली. हे सरकार गोव्याचे वाळवंट करायला निघाले आहे.

भावी पिढीला संकटात टाकणाऱ्या भाजपला वेळीच धडा शिकविणे गरजेचे आहे. राज्य सरकार केंद्राचे म्हणणे ऐकून घेताना जनतेचे मत जाणून घेत नाही. गोव्यातील जनतेने भावी पिढीसाठी गोवा वाचवला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

किती लोकांची कामे झाली?

प्रशांत नाईक म्हणाले की, ‘प्रशासन जनतेच्या दारी’ म्हणणाऱ्या सरकारने किती लोकांची कामे झाली, याचा हिशेब लोकांना द्यावा. केवळ जनतेच्या पैशांवर फुकटच्या जाहिराती बंद कराव्यात.

केंद्राच्या कळसूत्री बाहुलीप्रमाणे नाचणारे सरकार गोव्याचे हित जपणार नाही. भविष्यात दूधसागर गोव्यापासून तोडला तर दक्षिण गोव्यातील जनतेवर अन्याय होणार आहे, असे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com