Japanese Prime Minister Fumio Kishida arrives in Delhi: संरक्षण आणि सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणूक आणि उच्च तंत्रज्ञान यासह विविध क्षेत्रात द्विपक्षीय संबंध अधिक विस्तारित करण्याच्या उद्देशाने किशिदा आज सकाळी नवी दिल्लीत पोहोचले आहेत.
या दौऱ्यात चीनच्या वाढत्या लष्करी आक्रमकतेमुळे इंडो-पॅसिफिक प्रदेशातील उदयोन्मुख आव्हाने, यावर देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि किशिदा यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे.
जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा हे पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर (Rajeev Chandrasekhar) यांनी पंतप्रधान फुमियो किशिदा यांचे स्वागत केले आहे
जपानचे पंतप्रधान किशिदा यांच्या स्वागतावेळी मराठमोळी लावणी लावण्यात आली होती. वाजले की बारा या लावणीवर नाचणाऱ्या मुलींना पाहून त्यांचे नृत्य पाहण्याचा मोह जपानच्या पंतप्रधानांनाही आवरला नाही. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर हे देखील उपस्थित होते. किशिदा यांनी काही वेळ थांबून लावणी नृत्य पाहिले.
पंतप्रधान मोदी सकाळी 11 वाजता जपानच्या पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. इंडो पॅसिफिकसह अनेक मुद्द्यांवर चर्चा दोघांमध्ये चर्चा होणार आहे. या भेटीत, किशिदा मुक्त आणि मुक्त इंडो-पॅसिफिक प्रदेशासाठी आपल्या योजनेबाबत माहिती देऊ शकतात.
चीनच्या वाढत्या लष्करी आक्रमकतेमुळे इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील उदयोन्मुख आव्हानांवर मोदी आणि किशिदा यांच्यात चर्चा होऊ शकते. यादरम्यान दोन्ही नेते मुक्त इंडो-पॅसिफिकसाठी आपली भूमिका स्पष्ट करतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.