
पणजी: चुकीचे कायदे आणून गोव्यात जमिनी विकल्या जात आहेत. गोवा वाचवण्यास समविचारी सर्व पक्षांनी एकत्रित येणे गरजेचे आहे. प्रसंगी राज्यहितासाठी एक पाऊल मागे घेण्याची तयारी आहे, असे मत द.गोवा खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी व्यक्त केले.
‘गोमन्तक टीव्ही’वरील ‘सडेतोड नायक’ या कार्यक्रमात संचालक-संपादक राजू नायक यांनी खासदार फर्नांडिस यांची गुरुवारी मुलाखत घेतली, त्यात बोगस मतदारांपासून ते आगामी विधानसभा निवडणुकीविषयी आपली स्पष्टपणे भूमिका मांडली.
राहुल गांधी यांनी ‘मत चोरी’द्वारे लक्ष वेधले आणि दिल्लीपासून सर्वत्र हा विषय गाजत आहे. निवडणूक आयोगाविरुद्ध जो विषय घेण्यात आला आहे. मतदानाचा, तो संविधनाने दिलेला हा हक्क आहे. त्याशिवाय पक्षाच्या कल्पना पटल्याने लोक त्यास मत देतात.
आता मतदारांनी ज्या पक्षाला मत दिले, ते मत दुसऱ्याच पक्षाला गेल्याचे दिसते. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आले, तेव्हा अमित शहांनी पुढील ५० वर्षे आम्ही सत्तेत राहू असे जाहीर केले होते. मत चोरीचाच त्यांचा हा सत्तेकडे जाणारा मार्ग आहे, हे स्पष्ट दिसते, असे विरियातो म्हणाले. हे तर ‘इन्स्टिट्यूनशल कॅप्चर’
यापूर्वी शंभर-दोनशे मते घुसवली जायची, पण आता बोगस मतदारांचा प्रकार ‘इन्स्टिट्यूनशल कॅप्चर’सारखा आहे. बोगस मतदारांविरुद्धचा हा विषय खोलवर कसा नेला जाणार आहे, यावर विरियातो म्हणतात, आम्ही एक-एक मतदारांना जागे करू. बोगस मतदारांविरुद्ध प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दोन दिवसांपूर्वी मोर्चा काढला ही चांगली बाब आहे.असेही फर्नांडिस यांनी नमूद केले.
पावसाळी अधिवेशनात सातही आमदारांनी एकत्रितपणा दाखवला, त्यांनी सरकारचा भ्रष्टाचार उघड केला, पक्ष नेतृत्वाविषयी विरियातो सांगतात, कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असले तरी म्हादईच्या विषयावर तुमचा हक्क आहे, तुम्ही लढा द्या, असे स्थानिक नेत्यांना असे केंद्रीय नेतृत्व सांगते.
आरजीबरोबर युतीविषयी विरियातो म्हणतात, एकाच मुद्द्यावर पक्षांची युती होत नाही, तर त्यांची विचारसरणी काय आहे, हे महत्त्वाचे आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यातील अमलीपदार्थ बंद कर म्हटल्यावर तो बंद होऊ शकतो. उत्तर गोव्यातील किनारा या अमलीपदार्थांच्या व्यवहारामुळे नष्ट झाला आहे, याविषयी सर्व माहिती त्यांना आहे, असे सांगत विरियातो म्हणाले, काश्मीरमध्ये जमिनी घेण्याविषयी इतरांना बंधन होते, तो कायदा काढला गेला, परंतु गोव्यातही तसा कायदा होऊ शकतो.
विधानसभा निवडणुकीसाठी रिव्होल्युशनरी गोवन्सला सोबत घेण्याबाबत स्थानिक नेतृत्वाचा निर्णय आहे. पक्षाला काय फायदा होणार आहे, हे न पाहता राज्याच्या भल्यासाठी एकत्र येणे आवश्यक आहे. भविष्यातील राजकीय वाटचालीविषयी निर्णय घेण्याच्या सल्लागार समितीत आपला सहभाग नाही, स्थानिक नेत्यांनी या समितीत आपला सहभाग केला नाही,असे विरियातो यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.