जामगळ-नेत्रावळी पुलावरून पडून रमाकांत गावकर (50) यांचा मृत्यू झाला. यानंतर जामगळ पुलासोबतच राज्यातील इतर पुलांच्या दुरुस्तीच्या कामाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याबाबत गोमंतकने आवाज उठवल्यानंतर आरजीचे आमदार वीरेश बोरकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला.
जामगळ-नेत्रावळी पूल हा अतिशय वाईट अवस्थेत असून, पुलाचा कठडा अनेक ठिकाणी मोडलेला आहे. याच कारणामुळे बुधवारी अपघात घडला. पुलाच्या कठड्यावरून तोल जाऊन रमाकांत खाली पडले आणि त्यांचा मृत्यू झाला.
अशाच अनेक घटना याआधीही समोर आल्या आहेत. जामगळ पुलासारखे लहान पूल हे दोन गावांना जोडणारा आणि वाहतुकीचा प्रमुख मार्ग असतात. त्यामुळे यांची वेळोवेळी देखरेख होणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. सार्वजनिक बांधकाम खाते आता मुख्यमंत्र्यांकडे असून त्यांनी हे प्रश्न सोडवले पाहिजेत.
याबाबत गोमंतक टीव्हीने आवाज उठवल्यानंतर आरजीचे आमदार वीरेश बोरकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला. जामगळ सोबतच राज्यातील इतर पुलांच्या दुरुस्तीची कामेही लवकरात लवकर पूर्ण व्हावीत, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
वीरेश बोरकर हे आजचा पूर्ण दिवस सांगेमध्ये दौऱ्यावर आहेत. ते सांगेतील मासे विक्रेते, भाजी विक्रेते आणि दुकानमालकांची भेट घेणार आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.