Goa Grand Alliance: 'जनभावनेला प्राधान्य, घाईगडबडीत निर्णय नाही'; ग्रँड अलायन्सवर विजय सरदेसाईंची भूमिका स्पष्ट

Vijay Sardesai Grand Alliance: विधानसभा निवडणुकीत सर्व पक्षांनी एकत्र यावे अशी काहींची इच्छा आहे, तर काहींना गोवा फॉरवर्ड पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवावी असे वाटते.
Vijay Sardesai Grand Alliance
Goa Grand AllianceDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

सासष्टी: विधानसभा निवडणुकीत सर्व पक्षांनी एकत्र यावे अशी काहींची इच्छा आहे, तर काहींना गोवा फॉरवर्ड पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवावी असे वाटते. मात्र, जनतेची भावना ‘ग्रँड अलायन्स’ची असल्याची जाणीव असून लोकभावनेचा आदर करून त्याला प्राधान्य देण्यात येईल, असे गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

आपल्या पक्षाची आम आदमी पक्षासोबतची युती कायम असून, सध्या पितृपक्ष असल्याने आपण शांत आहोत, असे सरदेसाई यांनी स्पष्ट केले. युतीच्या संदर्भात आमच्यासमोर अनेक पर्याय असून इतर पक्षांसाठीही दरवाजे खुले आहेत, असे सरदेसाई म्‍हणाले.

Vijay Sardesai Grand Alliance
Goa Foundational Learning Survey: पहिली-दुसरीच्या विद्यार्थ्यांचा आता 'लर्निंग सर्व्हे'; वाचन, लेखन अन् गणितातील पायाभूत कौशल्यांची कमतरता शोधणार

‘ग्रँड अलायन्स’साठी सर्व पक्षांनी एकमेकांना समजून घेणे आणि लोकांच्या मतांचा आदर राखणे याला आपले प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हिंदू धर्मानुसार पितृपक्षात मोठे निर्णय घेतले जात नाहीत. कोणतीही चूक होऊ नये यासाठी काळजी घेतली जाते. निवडणुका अद्याप दूर असल्याने घाईगडबडीत निर्णय घेणे योग्य ठरणार नाही, असेही सरदेसाई यांनी स्‍पष्‍ट केले.

लोकांना एक चांगला आणि भक्कम पर्याय देण्यासाठी जे काही करावे लागेल, ते करण्याची आपली तयारी असल्याचे सरदेसाई यांनी नमूद केले. अलीकडेच त्यांनी व्यापक विरोधी आघाडीची गरज व्यक्त केली होती; त्यानंतर काँग्रेसकडूनही आघाडीबाबत सकारात्मक संकेत देण्यात आल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, पीपल्स पाथ योजनेच्या कामाची पाहणी करताना हळदोणेचे काँग्रेस आमदार कार्लुस फेरेरा तेथे आले होते. त्यांनी कामाची प्रशंसा केली. मात्र, यावेळी आपल्यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे सरदेसाई यांनी स्पष्ट केले.

गुदिन्होंना आता सत्य समजले; ‘दाबोळी’ बंद करण्याचे षड्यंत्र

मोपा विमानतळ सुरू झाल्यापासून आपण दाबोळी विमानतळ बंद होण्याची शक्यता व्यक्त करत आलो आहोत. आता नौदलाच्या माध्यमातून ते षड्यंत्र सुरू असल्याचे वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होत आहे. त्यांना हे सत्य उलगडले, हे चांगले झाले, अशी प्रतिक्रिया गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली. मोपा विमानतळ सुरू झाला तेव्हाच दाबोळी विमानतळावरील सेवा बंद करू नयेत, अशी मागणी आपण किमान तीन वेळा केली होती. मात्र, आता दाबोळीवरील विमानसेवा हळूहळू कमी करण्याचे प्रयत्न होत असल्याचे दिसत असल्याचा दावा त्यांनी केला.

Vijay Sardesai Grand Alliance
Goa Tourism: दाबोळीवर उतरले 162 रशियन 'पाहुणे'; 2026-27 पर्यटन हंगामातील पहिले चार्टर दाखल, गोव्यात जंगी स्वागत

‘गोवा फर्स्ट’ युती कायम

गोवा फॉरवर्ड आणि आम आदमी पक्षाने १३ सप्टेंबर रोजी ‘गोवा फर्स्ट’ आघाडीची घोषणा केली होती. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही युती करण्यात आली असून, इतर समविचारी राजकीय शक्तींनाही सोबत घेण्याची भूमिका दोन्ही पक्षांनी व्यक्त केली होती, असे सरदेसाई यांनी स्‍पष्‍ट केले.

राजकीय चर्चांना वेग

सरदेसाई यांनी व्यापक ‘ग्रँड अलायन्स’ची भूमिका मांडल्यानंतर काँग्रेससोबतच्या संभाव्य राजकीय समीकरणांबाबत चर्चांना पुन्हा वेग आला आहे. काँग्रेसनेही गोवा फॉरवर्डसोबत युतीची शक्यता खुली असल्याचे संकेत दिल्याचे वृत्त आहे. मात्र, या संदर्भातील अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com