Viral Post: पणजीत सरकारी 'भवन'चे झाले 'हवन'! सोशल मिडिया पोस्ट झाली व्हायरल, अन्...

सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या पोस्टची दखल सरकारी खात्याला देखील घ्यावी लागली.
Udyog Bhavan, Panaji
Udyog Bhavan, PanajiDainik Gomantak

सोशल मिडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. आजकाल प्रत्येकाकडे मोबाईल फोन असल्याने समाजात वावरताना घडणाऱ्या विविध घटना चित्रित करून लगेच समाज माध्यमावर पोस्ट केल्या जातात. मग, क्षणार्धात अशा गोष्टी व्हायरल देखील होतात.

अशीच एक पणजीतील गमंतशीर घटना सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. यात एका सरकारी इमारतीवरील नावाचे एक अक्षर गायब झाल्याने इमारतीच्या नावाचा अर्थच बदलला होता. याचा फोटो काढून तो पोस्ट करण्यात आला आणि तो चांगलाच व्हायरल झाला. याची दखल अखेर सरकारी खात्याला देखील घ्यावी लागली.

Udyog Bhavan, Panaji
Goa Flight Bomb Threat : फेक! रशियातून गोव्यात येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची ती अफवाच

गोवा विद्यापीठात हिंदीचे प्राध्यापक असणारे आदित्य भांगी सोशल मिडियावर चांगलेच सक्रिय असतात. गोव्यात घडणाऱ्या विविध गोष्टींवर त्यांचे लक्ष असते. पणजीतील गोवा सरकारची उद्योग, व्यापार व वाणिज्य संचालनालयालची इमारत आहे. तिला उद्योग भवन (Udyog Bhavan, Panaji) इंग्रजी नाव देण्यात आले आहे.

दरम्यान, आदित्य भांगी यांच्या निदर्शनात आले तेव्हा 'भवन' या शब्दातील 'बी' हे इंग्रजी अक्षर गायब झाल्याने त्याचा अर्थ 'हवन' असा झाला होता. याचा फोटो काढून भांगी यांनी 12 जानेवारी रोजी ट्विटरवर पोस्ट केला. दरम्यान, या पोस्टची दखल घेऊन विभागामार्फत पूर्ण नामफलकच बदलून त्याठिकाणी नवीन अक्षरात 'उद्योग भवन' असे लिहण्यात आले आहे.

Udyog Bhavan, Panaji
Aires Rodrigues : आयरिश रॉड्रिग्ज यांच्या शिक्षेला सत्र न्यायालयाची स्थगिती

आदित्य भांगी यांनी विभागामार्फत तात्काळ दखल घेतल्याबद्दल प्रथम सोशल मिडियाचे आभार मानले आहेत. "एक अक्षर गायब झाले होते मात्र पोस्टची दखल घेऊन विभागाने थेट बोर्डच नवा बसविला." असे भांगी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

भांगी यांच्या पोस्टवर अनेकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. विशेष म्हणजे राज्याचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी देखील भांगी यांचे कौतुक करत, असेच चांगले काम करत राहा असे म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com