Aires Rodrigues : आयरिश रॉड्रिग्ज यांच्या शिक्षेला सत्र न्यायालयाची स्थगिती

म्हापसा जेएमएफसीने कथित सेक्स स्कँडल प्रकरणात दोषी ठरवत सुनावली होती शिक्षा
Goa News | Aires Rodrigues
Goa News | Aires RodriguesDainik Gomantak
Published on
Updated on

Aires Rodrigues : माजी जलसंपदा मंत्र्यांशी संबंधित कथित सेक्स स्कँडलप्रकरणी एका महिलेची सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी म्हापसा न्यायालयाने, अ‍ॅड. आयरिश रॉड्रिग्स यांच्या विरोधात दिलेल्या निर्णयाला उत्तर गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

5 जानेवारी 2023 रोजी म्हापसा जेएमएफसीने अ‍ॅड. आयरिश रॉड्रिग्स यांना कथित सेक्स स्कँडल प्रकरणात दोषी ठरवत शिक्षा सुनावली होती.

Goa News | Aires Rodrigues
Goa Flight Bomb Threat : फेक! रशियातून गोव्यात येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची ती अफवाच

फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 374(3) अन्वये दाखल केलेल्या अ‍ॅड. आयरिश यांच्या आव्हानावर सुनावणी घेताना हा आदेश सत्र न्यायालयाने दिला आहे. रॉड्रिग्स यांच्यातर्फे अ‍ॅड. अरुण ब्रास डिसा यांनी बाजू मांडली. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होईपर्यंत कोर्टाने रॉड्रिग्स यांचा जामीन मंजूर केला आहे.

Goa News | Aires Rodrigues
Savio Rodrigues : पोर्तुगीजांनी उद्वस्थ केलेली फक्त मंदिरेच नव्हे तर चर्चसाठी देखील समिती स्थापन करा

म्हापसा जेएमएफसीच्या आदेशाला 49 कारणांवरून अ‍ॅड. रॉड्रिग्स यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. पुढील सुनावणी ही 22 फेब्रुवारीला होणार आहे. 27 नोव्हेंबर 2017 रोजी हणजूण पोलिस स्थानकात अ‍ॅड. रॉड्रिग्स यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला होता. गुन्हा नोंद झाल्यानंतर हे प्रकरण क्राईम ब्रँचकडे सोपविले होते.

तीन वर्षांच्या तपासानंतर क्राईम ब्रँचने 27 नोव्हेंबर 2020 रोजी 210 पानांचे आरोपपत्र अ‍ॅड. आयरिश रॉड्रिग्स यांच्याविरोधात म्हापसा न्यायालयात दाखल केले होते. 5 जानेवारी 2021 रोजी या प्रकरणाचा खटला सुरू झाला. त्यानंतर दोन वर्षे व 40 सुनावणीनंतर याचा निकाल म्हापसा जेएमएफसी कोर्टाने दिलेला.

Goa News | Aires Rodrigues
Fatorda Attack Video : भयानक! फातोर्डात दुकानातील साथीदारावरच कोयत्याने जीवघेणा हल्ला; पहा व्हिडिओ

या प्रकरणात म्हापसा न्यायालयाने अ‍ॅड. आयरिश रॉड्रिग्स यांना दोषी ठरवून विविध गुन्ह्यांखाली एकूण 2 वर्षे 3 महिन्यांची साधी कैद व 10 हजारांचा दंड ठोठावला होता. मात्र, या शिक्षेला अ‍ॅड. रॉड्रिग्स यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले होते.

त्याचप्रमाणे आव्हान अर्जावरील सुनावणी होईपर्यंत या शिक्षेला स्थगिती व जामीन द्यावा, अशी विनंती त्यांनी केली होती. त्यानुसार, या शिक्षेला उत्तर गोवा अतिरक्त न्यायालयाने स्थगिती दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com