Goa Flight Bomb Threat : फेक! रशियातून गोव्यात येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची ती अफवाच

पहाटे 3.30 च्या सुमारास धमकीच्या ई-मेलनंतर दाबोळी विमानतळावर मोठा पोलीस बंदोबस्त, अग्निशमन दल आणि बॉम्ब स्कॉडचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Moscow to Goa gets bomb threat
Moscow to Goa gets bomb threatDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यात येणार्‍या अझूर एअरलाइन्सच्या रशियन चार्टर विमानाला आज पुन्हा एकदा बॉम्बची धमकी मिळाली. गोव्यातील दाबोळी विमानतळ संचालकांना बॉम्बची धमकी देणारा एक मेल मिळाला. यानंतर तात्काळ मॉस्कोतून गोव्यात येणाऱ्या विमानाचे उझबेकिस्तान येथे इमर्जन्सी लॅन्डिंग करण्यात आले. (Plane from Moscow to Goa gets bomb threat, ‘no dangerous substances’ found)

पहाटे 3.30 च्या सुमारास धमकीच्या ई-मेलनंतर दाबोळी विमानतळावर मोठा पोलीस बंदोबस्त, अग्निशमन दल आणि बॉम्ब स्कॉडचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Moscow to Goa gets bomb threat
Goa Flight Bomb Threat : पुन्हा बॉम्बची धमकी! गोव्यात येणारे अझूर एअरलाइन्स उझबेकिस्तानमध्ये वळवले

दरम्यान, या विमानाचे उझबेकिस्तान येथे इमर्जन्सी लॅन्डिंग करण्यात आले. त्यानंतर येथील सुरक्षा यंत्रणांनी विमानची संपूर्ण तपासणी केली. विमानात कोणत्याही प्रकारचा धोकादायक पदार्थ सापडला नाही. असे रशिया एम्बेसीने म्हटले आहे. रात्री आठ वाजता हे विमान उझबेकिस्तान येथून गोव्यासाठी उड्डाण घेईल असे रशिया एम्बेसीने अधिकृतपणे म्हटले आहे.

यापूर्वी देखील विमानात बॉम्ब असल्याची सूचना मिळाल्यानंतर एम्बेसी क्षणाक्षणाची अपटेड घेत असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली. याकाळीत विमानातील प्रवाशांची तेथील एका हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली. असे एम्बेसीने म्हटले आहे.

Moscow to Goa gets bomb threat
Mahadayi Water Dispute: सभागृह समितीचा घाट कशासाठी? काय म्हणाले विजय सरदेसाई

यापूर्वी देखील रशियातून गोव्यात येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याचा एक धमकीचा ई-मेल आला होता. मॉस्कोहून दाबोळी विमानतळावर उतरण्याच्या तयारीत असलेल्या रशियन चार्टर विमानात बॉम्ब असल्याची माहिती 9 जानेवारी रात्री उशिरा गोवा एअर ट्रॅफिक कंट्रोलला मिळाली होती.

यानंतर 244 प्रवाशी असलेले हे विमान तातडीने जामनगर-गुजरात विमानतळाकडे वळवण्यात आले होते. तिथे रात्री 9.49 वाजता विमानाचे सुरक्षित लॅन्डिंग करण्यात आले. या विमानाची देखील तपासणी केल्यानंतर त्यात काही सापडले नव्हते त्यानंतर ते विमान सुरक्षित गोव्यात दाखल झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com