शिवोली: येत्या सहा महिन्याच्या कालावधीत शिवोली पंचक्रोशीतील जागोजागचे जुने वीज ट्रान्स्फॉर्मर (Transformers) बदलण्याचे काम हाती घेण्यात आले असून सध्याच्या असुरळीत वीज पुरवठ्याला (Power Supply) त्यामुळे कायमचा आळा बसणार असल्याचे शिवोलीचे आमदार तथा माजी मंत्री विनोद पालयेंकर यांनी सांगितले. इंग्रजवाडा-मार्ना शिवोली येथील चर्च परिसरात नवीन ट्रान्स्फॉर्मरची (Transformers) पायाभरणी केल्यानंतर पालयेंकर बोलत होते. यावेळी मार्ना शिवोलीच्या सरपंच शर्मीला वेर्णेकर, उप-सरपंच विलीयम फर्नाडीस, पंच सदस्य सिल्वेस्टर फर्नाडीस, फेर्मीना फर्नाडीस, मोनाली आगरवाडेकर, तसेच स्थानिक चर्चचे धर्मगुरू उपस्थित होते.
दरम्यान, हणजुण पंचायत क्षेत्रात आतापर्यंत तेहतीस कोटींचे भुमीगत वीज वाहिन्या (Power lines) टाकण्याचे काम पुर्ण झालेले आहे. त्यामुळे लवकरच याभागात अजून तेवीस नवीन वीज ट्रान्स्फॉर्मर (Power transformer) बसवण्यात येणार असल्याची माहिती आमदार पालयेंकर यांनी दिली.
त्यांचप्रमाणे पावसाळा संपताच ऑक्टोबरच्या सुरुवातीला पंचक्रोशीतील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांचे (Roads) डांबरीकरण हाती घेण्यात येणार असल्याने यापुढे पुर्ण कायापालट झालेला शिवोलीचा मतदारसंघ तुमच्या समोर दिसणार असल्याचे आश्वासन पालयेंकर यांनी दिले. यावेळी सरपंच शर्मीला वेर्णेकर तसेच उप-सरपंच विलीयम फर्नाडीस यांचीही समयोचित भाषणे झाली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.