Foreigners Suspiciously Died In Goa: बलात्कार, मारहाण, खून; गोव्यात रहस्यमय पद्धतीने मृत झालेले विदेशी पर्यटक: भाग 2

गोव्यात झालेल्या परदेशी पर्यटकांच्या संशयास्पद मृत्यूची माहिती या लेख मालिकेद्वारे घेण्यात आली आहे.
Foreigners Died Suspiciously In Goa
Foreigners Died Suspiciously In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Foreigners Died Suspiciously In Goa: गोव्यात झालेल्या परदेशी पर्यटकांच्या संशयास्पद मृत्यूची माहिती आपण घेत आहोत. पहिल्या लेखात आपण पाच अशा परदेशी पर्यटकांची माहिती घेतली, ज्यांच्या मृत्यूचे रहस्य त्याबाबत तपास केल्यानंतर देखील अद्याप गूढ बनून राहिले आहे. लेखाच्या दुसऱ्या भागात अशाच पद्धतीने रहस्य बनून राहिलेल्या परदेशी पर्यटकांच्या संशयास्पद मृत्यूची माहिती आपण घेणार आहोत.

या लेखात काही गाजलेल्या घटना आहेत ज्यात बलात्कार, मारहाण आणि हत्या असे आरोप करण्यात आले आहेत.

बलात्कार अन् हत्या ब्रिटीश, आयरिश डॅनिएल मॅक्लॉफिन सहा वर्षांपासून न्यायाच्या प्रतिक्षेत

डॅनियल मॅक्लॉफिन या 28 वर्षीय ब्रिटीश - आयरिश महिलेचा मार्च 2017 मध्ये पाळोळे परिसरात संशयास्पद पद्धतीने मृतदेह आढळून आला. बलात्कार करून तिचा खून केल्याची माहिती समोर आल्यानंतर स्थानिक 24 वर्षीय विकट भगत विरोधात याप्रकरणी बलात्कार आणि खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

डॅनियल 13 मार्च 2017 रोजी पाळोळे येथील बीच रिसॉर्ट येथे आयोजित एका होळीच्या कार्यक्रमात सहभागी झाली होती. दुसऱ्या दिवशी तिचा विद्रुप केलेला मृतदेह देवबाग बीचजवळ आढळून आला.

आरोपी भगत वरती दाखल केलेल्या 378 पानी आरोपपत्रात त्याने डॅनियलचा बलात्कार करून खून केला. तसेच, तिचा चेहरा ओळखू नये म्हणून तो विद्रुप केला, असे म्हटले आहे. भगत अटकेत असून, सध्या याप्रकरणी मडगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात खटला सुरू आहे.

अलिकडे एप्रिल महिन्यात ब्रिटीश, आयरिश राजदूतांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली व डॅनिएलच्या खून प्रकरणाचा खटला वेगवान करून लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी केली.

भारतासह जगभरात गाजलेले स्कार्लेट किलिंग बलात्कार आणि हत्या प्रकरण

गोवा पर्यायाने भारतात आणि जगभरात स्कार्लेट किलिंग हत्या प्रकरणाची सर्वत्र खूप चर्चा झाली. या प्रकरणात ड्रग, बीच पार्टी, बलात्कार, हत्या, स्थानिक पोलिस ते सीबीआय एवढा गुंता आहे. तरीसुद्धा तब्बल अकरा वर्षानंतर या प्रकरणात एका आरोपीला दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली, तर एकाला पुरेशा पुराव्यांअभावी सुटका करण्यात आली. मात्र, पूर्णपणे न्याय मिळाला नाही असा आरोप स्कार्लेटचे कुटुंबीय करतात.

15 वर्षीय स्कार्लेट किलिंग 17 फेब्रुवारी 2008 रोजी हणजूणे येथे मृतावस्थेत आढळून आले. पोलिसांनी सुरूवातीला या प्रकरणी तिचा बुडून मृत्यू झाला असल्याचा अंदाज बांधत अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली. दरम्यान, स्कार्लेटच्या कुटुंबीयांनी मागणी केल्यानंतर तिचे दुसऱ्यांदा शवविच्छेदन करून, त्यानंतर मार्चमध्ये याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता हा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला. सीबीआयने तात्काळ दोन आरोपी (सॅमसन डसूझा आणि प्लॅसिडो कारव्हालो) यांना अटक केली.

मात्र, 2016 मध्ये न्यायालयाने दोघांची निर्दोष मुक्तता केली. पण, सीबीआयने या निर्णयाविरोधात पुन्हा अपील केली आणि अखेर जुलै 2019 मध्ये जवळपास अकरा वर्षानंतर सॅमसन डसूझा याला अकरा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व 2.60 लाख रूपयांचा दंड ठोठावला. तर, प्लॅसिडो कारव्हालो याची पुरेशा पुराव्यांअभावी सुटका करण्यात आली.

साडेचार वर्षे दफन केला नाही मृतदेह

स्कार्लेटच्या हत्या प्रकरणात जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत तिचा मृतदेह दफन करणार नाही. अशी भूमिका तिच्या कुटुंबियांनी घेतली. अखेर 2012 मध्ये त्यांनी तिचा मृतदेह दफन केला. तसेच, पुन्हा गोव्यात कधी येणार नाही असेही तिच्या आईने बोलून दाखवली.

Foreigners Died Suspiciously In Goa
Foreigners Died Suspiciously In Goa: देअर लास्ट ट्रीप! गोव्यात रहस्यमय पद्धतीने मृत झालेले विदेशी पर्यटक: भाग 1

पत्त्यात 800 ब्रिटीश पौंड जिंकले अन् हरमल येथे सापडला मृतदेह

युकेचा 39 वर्षीय मार्टिन नेबर फेब्रुवारी 2008 मध्ये हरमल समुद्रकिनाऱ्यावर मृतावस्थेत आढळून आला. मार्टिनचा बुडून मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

मार्टिनच्या घरच्यांनी मात्र हा दावा खोडून काढत मार्टिनला मारहाण केल्याने त्यात त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप केला. मार्टिनच्या बहिणीने लंडनमधील एका चौकशीत भावाच्या गूढ मृत्यूबाबत माहिती दिली. मार्टिन स्थानिक लोकांसोबत पत्त्याच्या खेळात सुमारे 800 ब्रिटीश पौंड (80 ते 85 हजार भारतीय रूपये) जिंकले होते. आणि पैशांसाठी स्थानिकांनी मारहाण करून त्याची हत्या केली असे मार्टिनची बहीण म्हणाली होती.

मार्टिनचा मृतदेह समुद्रात सापडला तेव्हा त्याच्या अंगावर फाटलेले कपडे, शूज आणि डोक्यावर जखमा झाल्याचे आढळून आले. तसेच, त्यांने जिंकलेल्या पैशांचा कधीच थांगपत्ता लागला नाही.

दरम्यान, मार्टिनचा पैशांसाठीच खून केल्याची त्याच्या घरच्यांनी आरोप केला. पोलिसांनी मात्र, समुद्रात खडकाला डोके धडकल्याने त्याला जखम झाली व त्यानंतर बुडून त्याचा मृत्यू झाला असे म्हटले आहे.

25 व्या वर्षापर्यंत 32 देशांची भ्रमंती पण गोव्यात आल्यावर जीव गमावला.

कॅनडाचा रहिवाशी असलेल्या काइल आर्डट याने 25 व्या वर्षापर्यंत विविध 32 देशांत भ्रमंती केली. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी डिसेंबर 2013 मध्ये तो गोव्यात आला. क्रीडा आणि साहसी प्रकार करण्यात रस असलेला तरूण काइल गोव्यात संगीत पार्टीचा आनंद घेण्यासाठी आला होता. 24 डिसेंबर रोजी तो हरमल येथे संगीत पार्टीत सहभागी झाला व माघारी घेऊन झोपी गेला.

दुसऱ्या दिवशी सकाळी काइल हॉटेलच्या रूममध्ये मृताव्यस्थेत आढळला. काइल युरोपियन मित्रासोबत हॉटेलच्या रूममध्ये एकत्र राहत होता.

काइलच्या घरच्यांनी तो राहत असलेली हॉटेल रूम किटकनाशकाच्या फवारणीमुळे दुषित झाली होती किंवा त्यांनी घेतलेल्या पेयांमध्ये काही प्रमाणात वाढ केल्याचा आरोप केला.

काइलच्या कुटुंबियांना आजवर त्याच्या शवविच्छेदन अहवाल मिळाला नाही. असे विविध माध्यामातून आलेल्या वृत्तामधून समजते. तसेच, या प्रकरणाचा तपासच योग्य पद्धतीने झाला नसल्याचा तसेच, काही ठोस पुरावे समोर आले नाहीत असा आरोप काइलच्या घरच्यांनी केला आहे.

स्वीडिश तरूण फेलिक्स दहलचा मृतदेह आढळला त्याच भागात 16 दिवसांनी युकेच्या जेम्स डर्किनाचा मृतदेह सापडला

फेलिक्स दहल या 22 वर्षीय स्वीडिश तरूणाचा 28 जानेवारी 2015 रोजी पाटणे काणकोण येथे मृतदेह सापडला होता. त्याच भागात युकेच्या 34 वर्षीय जेम्स डर्किनाचा मृतदेह सापडला.

जेम्सचे टोपणनाव 'जिमी' होते, पाळोळे येथे समुद्रकिनाऱ्यावर कोसळल्यानंतर तो बेपत्ता झाला. तर, त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. रूग्णालयातून बाहेर आल्यानंतर कोळंब येथे त्याला सोडण्यात आले. असे त्याचे कुटुंबीय सांगतात. दरम्यान, बेपत्ता झाल्याच्या काही दिवसानंतर त्याचा मृतदेह आढळून आला.

पोलिसांनी याप्रकरणी जेम्सचा मृत्यू बुडून झाल्याचे म्हटले आहे. तर, जेम्सचे कुटुंबीय हा खून असल्याचा आरोप करत आहेत. तसेच, फेलिक्स दहल आणि जेम्स डर्किन यांच्या खूनात काही संबध असण्याची शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

मृतांचे नातेवाईक काय म्हणतात?

स्कार्लेट किलिंगच्या आई फियोना म्हणतात, न्याय मिळण्यासाठी लागलेला वेळ यापेक्षा झालेली शिक्षा फार कमी आहे. तरी ठिक आहे पण तो गुन्हेगार पुन्हा बाहेर येणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. असे त्यांनी बीबीसीला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.

फेलिक्स दहल प्रकरणात नि:पक्ष तपास झाला नाही असे त्याची आई मिना पिरोने यांनी म्हटले आहे. याशिवाय दहल याची मावशी सना कटर यांनी या प्रकरणात प्राथमिक तपास योग्य पद्धतीने झाला नाही तसेच, अधिकाऱ्यांनी सहकार्य केले नसल्याचा आरोप त्यांनी केला.

फेलिक्स प्रकरणात पुरेसे पुरावे नसल्याचा दाखला देत सीबीआयने क्लोजर अहवाल दाखल केला, त्यावर सना यांनी, त्या समाधानी नसल्याचे म्हटले आहे. तसेच, या प्रकरणाचा छडा लागत नाही तोवर त्याचा पिच्छा सोडणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

(उत्तरार्ध) 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com