Goa Politics: "गोंयात सरकारी व्यवस्था असा कितें?",पोलीसच गुंड बनलेत, कायदा-सुव्यवस्था कोलमडलीये; युरी-सरदेसाईंचा थेट हल्ला

goa law and order: गोवा फॉरवर्ड पार्टीचेअध्यक्ष विजय सरदेसाई यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीवरून भाजप सरकारवर जोरदार टीका केली
Goa Political News
Goa Political NewsDainik Gomantak
Published on
Updated on

vijai sardesai slams bjp government: गोवा फॉरवर्ड पार्टीचेअध्यक्ष विजय सरदेसाई यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीवरून भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. पोलिसांच्या वाढत्या गुन्हेगारीतील सहभागामुळे राज्यात 'गुंडाराज' सुरू झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आणि यानंतर विरोधीपक्षनेते युरी आलेमाव यांनी देखील त्यांचीच री ओढली.

खाकी वर्दीतील गुंड: "पोलिसांनी बंदूकधारी बनू नये"

कुडचडे येथे रेती माफियांकडून झालेल्‍या गोळीबारात रेती उपसा करणाऱ्या कामगाराचा दुर्दैवी मृत्‍यू झाला. यात गनमॅन बनून आलेले पोलिसच होते. पोलिसांनीच हे प्रकरण उघड केलं आणि पोलिसांनीच अटक देखील केली. विजय सरदेसाई यांनी समाजमाध्यमांवर एक निवेदन जारी करत भाजप सरकारवर निशाणा साधला.पोलीसच गुंड बनलेत, कायदा व सुव्यवस्था कोलमडलीये; युरी-सरदेसाईंचा थेट हल्ला

ते म्हणाले, "जेव्हा पोलीसच बंदूकधारी बनतात, तेव्हा कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडते. या भाजप सरकारच्या काळात गुंड वर्दी घालतात आणि गोमंतकीय जनता भीतीच्या छायेत जगत आहे." त्यामुळे सरदेसाई यांच्या मते, गोव्याला 'गुंडगिरी' नव्हे, तर सुशासनाची गरज आहे. सरदेसाई म्हणाले की, एका मंत्र्याने दिलेल्या माहितीनुसार आयपीएस अधिकारीच काही ठिकाणी कार्यक्रम भरवण्याची परवानगी देत आहेत.

Goa Political News
Goa Politics: खरी कुजबुज; ही, बोरी पुलाबाबत लोकांची दिशाभूल तर नव्हे?

'पोलीस स्टेशन म्हणजे गुंडांची टोळी': वसुली आणि कोकेनचा आरोप

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी देखील समोर येत अत्यंत कठोर शब्दांत टीका करताना म्हटले की, गोवा भाजप सरकार पोलिसांवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरले आहे. परिणामी, पोलीस स्टेशन हे 'गुंडांची टोळी' बनले आहेत. त्यांनी आरोप केला की, पोलीस कर्मचाऱ्यांचा गुन्हे, 'वसुली' आणि कोकेन सारख्या अवैध कृत्यांमध्ये सहभाग वाढत असल्याचे कारण हेच आहे.

त्यांनी थेट प्रश्न विचारला आहे की, "पोलीस स्टेशनमध्ये कोणा एका अस्सल पोलीस अधिकाऱ्याला आणि गुंड/गँगस्टरला ओळखायचे कसे?" पोलीस कर्मचाऱ्यांच्या या कृत्यांमुळे राज्यात कायदा व सुव्यवस्था कोलमडण्यास हातभार लागला आहे, ही राज्यासाठी मोठी लाजिरवाणी गोष्ट असल्याचे मत विरोधी पक्षनेत्यांनी यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com