konkan Railwayच्या पावसाळी वेळापत्रकात बदल; जाणून घ्या प्रवास करण्यापूर्वी सर्व गाड्यांची माहिती

रेल्वे प्रवाशांनी आपल्या तिकिटावरील वेळेची खात्री करून घ्यावी : प्रशासन
Kokan Railway
Kokan Railway Dainik Gomantak
Published on
Updated on

आजपासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत कोकण रेल्वेने प्रवासी गाड्यांसाठी पावसाळी वेळापत्रक लागू केले आहे. त्यामुळे अनेक गाड्यांच्या वेळात बदल झालेले आहेत. मात्र, त्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. तरीही रेल्वे प्रवाशांनी आपल्या तिकिटावरील वेळेची खात्री करून घ्यावी, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.

कोकणपट्ट्यात दरवर्षी मुसळधार पाऊस पडत असतो. त्यामुळे डोंगराळ भाग धोक्याचा बनलेला असतो. सुरक्षिततेच्या दृष्टीने पावसाळ्यात रेल्वे वाहतुकीवर बंधने घातली जातात. शिवाय वेगमर्यादेचाही विचार केला जातो. हे सर्व नजरेसमोर ठेवून गाड्यांचे वेळापत्रक बनवले जाते.

Kokan Railway
'PM किसान अंतर्गत मिळालेले पैसे परत करा', गोव्यातील 3,000 शेतकऱ्यांना झटका

यंदा 10 जून ते 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत या पावसाळी वेळापत्रकानुसार कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या चालविण्यात येतील याकडे प्रवाशांनी लक्ष द्यावे असे आवाहनही अधिकाऱ्यांतर्फे करण्यात आले आहे.

काही गाड्यांमध्ये झालेले बदल पुढीलप्रमाणे

कोकण कन्या एक्स्प्रेस (२०१११) शिवाजी टर्मिनसहून रात्री ११.०५ वाजता सुटेल व पेडण्यात दुसऱ्या दिवशी सकाळी ७.५६ ऐवजी ९.३६ वा., थिवीत ८.१० ऐवजी १०.०६ वा., करमळीत ८.३२ ऐवजी १०.२८ वा. व मडगावात ९.४६ ऐवजी ११.३५ वा. पोहचेल.

कोकण कन्या एक्स्प्रेस (२०११२) मडगावहून सायं. ७ वा.ऐवजी ६ वाजता सुटेल. ती सीएसटी मुंबईला दुसऱ्या दिवशी पहाटे पूर्वीप्रमाणेच ५.४० वा. पोहचेल.

मांडवी एक्स्प्रेस (१०१०३) सीएसटी मुंबईहून सकाळी ७.१० वा. सुटेल व पेडणेत सायं. ५.१५ ऐवजी ७.३२ वा., थिवीत ५.३० ऐवजी ७.४६ वा., करमळीत ५.५४ ऐवजी ८.२० वा. व मडगावात ७.१० ऐवजी रात्री ९.४५ वा. पोहचेल.

मांडवी एक्स्प्रेस (१०१०४) मडगावहून सकाळी ९.१५ ऐवजी लवकर म्हणजे ८.३० वाजता सुटेल. सीएसटी मुंबईला रोजच्याप्रमाणे रात्री ९.४५ वाजता पोहचेल.

जनशताब्दी (१२०५१) सीएसटी मुंबईहून पहाटे ५.१० वा. सुटेल व थिवीला त्याच दिवशी दुपारी १.०८ ऐवजी ३ वाजता व मडगावला २.१० ऐवजी ४.३० वा. पोहचेल.

जनशताब्दी (१२०५२) मडगावहून दुपारी २.४० ऐवजी लवकर म्हणजे दुपारी १२ वाजता सुटेल व सीएसटी मुंबईला रात्री ११.३० लावा. पोहचेल.

तेजस एक्स्प्रेस (२२११९) सीएसटी मुंबईहून पहाटे ५.५० वा. सुटेल व मडगावला दु. २.४० ऐवजी ५ वा. पोहचेल. (सोमवार व गुरुवार वगळता आठवड्यातून पाच दिवस)

तेजस एक्स्प्रेस (२२१२०) मडगावहून दुपारी ३.१५ ऐवजी लवकर म्हणजे १२.२५ वा. सुटेल व सीएसटी मुंबईला रात्री ११.५५ वा. पोहचेल. (सोमवार व गुरुवार वगळता आठवड्यातून पाच दिवस)

एलटीटी मडगाव एक्स्प्रेस (११०९९) लोकमान्य टिळक टर्मिनसहून रात्री १२.४५ वा. सुटेल व थिवीत दुसऱ्या दिवशी सकाळी ९.२४ ऐवजी ११ वा., करमळीला ९.४६ ऐवजी ११.२८ वा. व मडगावमध्ये ११.३० ऐवजी दु. १.२५ वा. पोहचेल. (आठवड्यातून चार दिवस मंगळवार, शुक्रवार, शनिवार व रविवार)

एलटीटी मडगाव एक्स्प्रेस (१११००) मडगावहून दुपारी १२.४५ ऐवजी लवकर सकाळी ११.३० वा. सुटेल व लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईला रात्री ११.२५ वा. पोहचेल. (आठवड्यातून चार दिवस मंगळवार, शुक्रवार, शनिवार व रविवार)

नेत्रावती एक्स्प्रेस (१६३४५) लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईहून सकाळी ११.४० वा. सुटेल. थिवीला रात्री ९.०८ ऐवजी ९.४० वा., करमळीला ९.४४ ऐवजी १०.०५ वा. व मडगावला १०.४० ऐवजी ११.३० वा. तसेच काणकोणला ११.१९ ऐवजी दु. १२.४० वा. पोहचेल. ही गाडी त्रिवेन्द्रम येथे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ६.०५ ऐवजी ७.३५ वा. पोहचेल.

नेत्रावती एक्स्प्रेस (१६३४६) त्रिवेन्द्रमहून सकाळी ९.१५ वाजता सुटेल व मडगावला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ४.३५ ऐवजी दु. ३.३० वा., करमळीला संध्याकाळी ४.१६ वाजता, थिवीला ४.३६ वाजता पोहचेल.

मत्स्यगंधा एक्स्प्रेस (१२६१९) लोकमान्य टिळक टर्मिनसहून दु. ३.२० वा. सुटेल व मडगावला दुसऱ्या दिवशी म्हणजे पहाटे २.२५ वा. पोहचेल व मंगळुरूला सकाळी १०.१० वा. पोहचेल.

मत्स्यगंधा एक्स्प्रेस (१२६२०) मंगळुरूहून दु. १२.४५ वा. सुटेल व मडगावला सायं. ७.०५ वा. पोहचेल व लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३५ वा. पोहचेल.

मंगळुरू एक्स्प्रेस (१२१३३ ) सीएसटी मुंबईहून रात्री १०.०२ वा. सुटेल. मडगावला दुसऱ्या दिवशी सकाळी ८.४० वा. पोहचेल व मंगळुरूला दु. ३.४० वाजता पोहचेल.

मंगळुरू एक्स्प्रेस (१२१३४) मंगळुरूहून दु. २ वा. सुटेल व मडगावला सायं. ६.४० वा. पोहचेल व सीएसटी मुंबईला दुसऱ्या दिवशी पहाटे ४.३५ वा. पोहचेल. शिवाय दादर ते सावंतवाडी व परत या तुतारी एक्स्प्रेस तसेच दिवा ते सावंतवाडी व परत या दिवा एक्स्प्रेसच्या वेळापत्रकांमध्येही बदल झालेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com