Hina Khan in Goa: गोव्याबाबत काय म्हणाली अभिनेत्री हिना खान; जाणून घ्या...

गोव्यात व्हेकेशनवर
Tv Actress Hina Khan in Goa
Tv Actress Hina Khan in GoaInstagram
Published on
Updated on

Hina Khan in Goa: टीव्ही जगतातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असलेली हिना खान सध्या गोव्यात सुट्टी साजरी करत आहे. हिनाने तिच्या गोव्यातील व्हॅकेशनचे फोटोज, व्हिडिओज तिच्या इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहेत. तसेच गोव्याविषयी देखील हिनाने आपले मत व्यक्त केले आहे. (Hina Khan Goa photos)

Tv Actress Hina Khan in Goa
Vagator Youth Drowned: सेल्फीच्या नादात वागातोर किनाऱ्यावर बुडालेल्या तरूणाचा मृतदेह सापडला

हिनाने गोव्यात मजा करतानाचे फोटो इन्स्टाग्रामवरून शेअर करत लिहिले आहे की, गोव्यातील एक दिवस. उत्तम अन्न, उत्तम सोबत आणि उत्तम वातावरण...

या सोबतच हिनाने गोव्यातील समुद्राचा एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे. गोव्यात ती राहत असलेले ठिकाण, ती चाखून पाहत असलेल्या डिशचा फोटोही तिने शेअर केला आहे.

दरम्यान हिनाच्या गोव्यातील फोटोंमध्ये हिनाचा नवीन लूक दिसत आहे. या फोटोंमध्ये हिना खानची स्टाइल अप्रतिम आहे आणि विविध पोजमध्ये ती डिवा दिसत आहे. या फोटोंमधील हिना खानची ग्लॅमरस स्टाईल पाहिल्यानंतर चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Tv Actress Hina Khan in Goa
Suraj Kumar: '... तर मी शाहरुख खानसमोर रडायला सुरु करेन'- असं का म्हणाला शाहरुखचा हमशकल

या फोटोंमध्ये हिनाने स्टायलिश जंपसूटमध्ये एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत. हिनाने स्टिलेटोस, गॉगल्स, कानातील आभुषणे आणि मनगटी घड्याळांसह तिचा लुक कॅरी केला आहे. मोकळ्या केसांसोबत स्मोकी मेकअप जुळवत हिना खानने स्वत:ला एक सुंदर लूक दिला आहे.

हिनाने गोव्यातील सुंदर दृश्याचा फोटोही चाहत्यांसोबत शेअर केला आहे. हिना खान 'ये रिश्ता क्या कहलाता है' मध्ये 'अक्षरा' ची व्यक्तिरेखा साकारत होती. या भूमिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. हे पात्र सुसंस्कृत सुनेचे होते. ती छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय बहु होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com