Goa Politics: "विजय सरदेसाई भाजप बरोबर जाणार नाहीत"! लोलयेकरांचा खुलासा; आमदार लोबोंबाबत म्हणाले की.. Watch Video

Vijai Sardesai BJP Entry: मायकल लोबो यांच्‍या वक्‍तव्‍याचा समाचार घेताना लोलयेकर म्‍हणाले, सध्‍याच्‍या राजकीय परिस्‍थितीत मायकल लोबो हे फक्‍त एक राजकीय जोकर आहेत.
Vijai Sardesai BJP Entry
Vijai Sardesai BJP EntryDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: विजय सरदेसाई हे भाजप बरोबर येणार, हे आमदार मायकल लोबो यांनी केलेले वक्तव्य तथ्यहीन आहे. विजय सरदेसाई कुठल्याही परिस्थितीत भाजप बरोबर जाणार नाही. भाजप विरोधात सर्व विरोधी पक्षांनी युती करावी, हे गोवा फॉरवर्डचे धोरण असून सरदेसाई हे त्याचाच पाठपुरावा करणार आहेत, असा खुलासा गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस मोहनदास लोलयेकर यांनी केला.

मायकल लोबो यांच्‍या वक्‍तव्‍याचा समाचार घेताना लोलयेकर म्‍हणाले, सध्‍याच्‍या राजकीय परिस्‍थितीत मायकल लोबो हे फक्‍त एक राजकीय जोकर आहेत. लोबो यांना कुठल्‍याही परिस्‍थितीत स्वतःला आणि त्‍यांच्‍या पत्‍नी आणि मुलाला उमेदवारी मिळवून जिंकवून आणायचे आहे. भाजपमध्‍ये राहून आपले हे ईस्पित साध्‍य होणार नाही, याची पूर्ण कल्‍पना असल्‍यामुळेच स्वतः भाजपातून बाहेर पडण्‍यासाठी ते अशी तथ्‍यहीन वक्‍तव्‍ये करीत आहेत.

मागच्‍या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्‍या उमेदवारीवर स्‍वत: आणि पत्‍नीला निवडून आणले होते. यासाठी त्‍यांनी काँग्रेस सोडणार नाही, अशी देवाची शपथही घेतली होती. पण ते तसे वागले नाहीत, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Vijai Sardesai BJP Entry
Goa Politics: खरी कुजबुज; सरकारी शाळा फुलणार ?

यापुढेही मायकल भाजप सोडून दुसऱ्या पक्षात जातील किंवा स्‍वत:चा पक्ष स्‍थापन करून निवडणूक लढवतील आणि जिंकून आल्‍यावर पुन्‍हा एकदा भाजपात जातील, असे भाकीत करताना लोलयेकर यांनी केले.

Vijai Sardesai BJP Entry
Goa Politics: "डबल इंजिन सरकारला आणखी गती द्या"! राष्ट्रीय अध्‍यक्ष नितीन नवीन यांचे कार्यकर्त्यांना स्फूर्तिदायी आवाहन

सध्या काँग्रेसबरोबर युती!

गेल्या पाच वर्षात भाजपावर सर्वांत जास्‍त टीका कोणी केली असेल, तर ती विजय सरदेसाई व गोवा फॉरवर्ड यांनीच आहे. गोवा फॉरवर्ड सध्‍या काँग्रेसबरोबर युतीत आहे. त्‍यामुळेच लोकसभा आणि जिल्‍हा पंचायत निवडणुकीत गोवा फॉरवर्डने काँग्रेसला पाठिंबा दिला. भविष्‍यातही पक्षाची भूमिका तीच असेल. काहीही झाले तरी भाजपाबरोबर गोवा फॉरवर्ड जाणार नाही, याबद्दल गोवेकरांनी निश्चित रहावे, असेही लोलयेकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com