खरी कुजबुज: नोकऱ्या कोणाला मिळतात?

Khari Kujbuj Political Satire: विजय सरदेसाई आपणाविरोधात आरोप करतात आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत सरदेसाईंच्या संंपर्कात राहातात कसे?
Khari Kujbuj Political Satire: विजय सरदेसाई आपणाविरोधात आरोप करतात आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत सरदेसाईंच्या संंपर्कात राहातात कसे?
Khari KujbujDainik Gomantak
Published on
Updated on

नोकऱ्या कोणाला मिळतात?

विजय सरदेसाई यांनी मडगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयात कारकून भरतीत स्वतःसाठी सात जागा मागितल्या होत्या, त्या न दिल्याने त्यांनी आपणाविरुद्ध आरोप चालविले असल्याचा बाबूश यांचा दावा आहे. गुरुवारच्या भाजपा सुकाणू समितीच्या बैठकीत बाबूशनी तसा आरोप केला. विजय यांचा या प्रकरणातला युक्तिवाद समर्पक आहे. मी सात जागा मागितल्या याचा अर्थ बाबूश यांनी पदांचे वाटे घातलेत का? बाबूश जर कोणाला अशा जागा देत असतील, तर या पदांसाठी ज्या १३ हजार उमेदवारांनी अर्ज केले होते, त्यांचे अस्तित्व काय? या उमेदवारांच्या मुलाखती व लेखी परीक्षेचा तपशील सरदेसाई यांनी आता मागितला आहे. एक गोष्ट खरी आहे की, नोकऱ्या केवळ सत्ताधाऱ्यांनाच नाही तर काही विरोधकांनाही द्यायची पद्धत गोव्यात पूर्वापार चालत आली आहे. मुलाखती हा फार्स असतो, हे या नोकरभरतीमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. ∙∙∙

पणजीची उमेदवारी

गुरुवारी भाजपाच्या सुकाणू समितीच्या बैठकीत बाबूश मोन्सेरात यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात तोफ डागली. विजय सरदेसाई आपणाविरोधात आरोप करतात आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत सरदेसाईंच्या संंपर्कात राहातात कसे? असा त्यांचा सवाल होता. भाजपाचे आमदार, नेते, पक्ष कोणीही आपल्या मागे नाही, आपण मंत्री आहोत तरी पक्ष आपल्याला पाण्यात पाहातो असा सरळसरळ आरोप बाबूश यांनी केला. या खदखदीमागे विजय सरदेसाईंचा आरोप आहे की बाबूश यांचे राजकीय अस्तित्व असा प्रश्‍न सुकाणू समितीच्या सदस्यांना पडला. आपल्याला मंत्रिमंडळातून काढून टाकले जाईल, असा सुगावा बाबूश यांना लागला आहे. बाबूशना वाटते की पुढच्या निवडणुकीत भाजपा पणजीची उमेदवारी उत्पल पर्रीकरांना देऊ पाहाते. पक्षश्रेष्ठीही तसा आग्रह धरतील. त्यामुळे आपण मंत्री असूनही ना घर का ना घाटका ठरलोय, अशी बाबूश यांची चिंता आहे. ∙∙∙

नॉट रिचेबल मंत्री

सेवा सप्ताहात जनतेपर्यंत कसे पोचायचे हे ठरवण्यासाठी भाजपची राज्य गाभा समिती, आमदार आणि मंत्र्यांची नुकतीच पणजीत एक बैठक झाली. विषय होता जनसंपर्काचा, तर त्याला बैठकीत भलतेच वळण लागले. आमदारांचेच कशाला सभापतींचाही फोन मंत्री घेत नाहीत. एखाद्यावेळी ते व्यस्त असल्यास मागाहून संपर्क साधू शकतात. मात्र, तसे करण्याचेही ते सौजन्य दाखवत नाहीत असा विषय अचानकपणे बैठकीत उपस्थित झाला. त्यामुळे जनसंपर्काचे सोडा आमदारांच्या मंत्री संपर्काचे त्रांगडे सोडवण्याची वेळ आली. आणखीन दोन वर्षांनी विधानसभेची निवडणूक आहे. आमदारांना उपलब्ध न होणारे मंत्री जनतेला काय उपलब्ध होणार आणि तसे झाले तर जनता मतदान तरी कशाला करेल असा प्रश्न या बैठकीतील चर्चा ऐकल्यावर पडल्याशिवाय राहिलेला नाही. सत्ताधारी भाजपकडे मोठे बहुमत असूनही विरोधातील सात आमदार त्यांना का पुरून उरत आहेत याचे उत्तरही या बैठकीत मिळाल्याची चर्चा आहे.∙∙∙

आप - काँग्रेसमध्ये दुही

गोव्‍यात काँग्रेस चाळीसही मतदारसंघात आपल्‍या कार्यकर्त्यांची फळी उभारणार अशी घोषणा काँग्रेस प्रदेशाध्‍यक्ष अमित पाटकर यांनी केल्‍यानंतर आपचे अमित पालेकर यांनी पाटकरांच्‍या या वक्‍तव्‍याला हरकत घेताना ही तर मुख्‍यमंत्र्यांनी लिहून दिलेली स्‍क्रीप्‍ट अशी टीका केली होती. त्‍यानंतर काल बाणावलीचे आपचे आमदार व्हेंझी व्‍हिएगस यांनी गोव्‍यात चालू असलेल्‍या जमीन रूपांतरांच्‍या भानगडींना काँग्रेसच जबाबदार असा आरोप करून पुन्‍हा एकदा काँग्रेसला अपशकून करण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. वास्‍तविक लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेस व आप एकत्र येऊन गोव्‍यात दोन्‍ही पक्षांची आघाडी असल्‍याचे जाहीर केले होते. ही आघाडी २०२७ च्‍या विधानसभा निवडणुकीपर्यंत कायम राहील अशी ग्‍वाही त्‍यांनी गोवेकरांना दिली होती. मात्र, आता आपचे पदाधिकारी काँग्रेसवर टीका करू लागले आहेत. यामुळे इंडिया आघाडीतील गोव्‍यातील आपचा इंटरेस्‍ट संपला आहे असे म्‍हणायचे का? ∙∙∙

रायबंदरवासीयांची धमक

गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या नावाआड पणजीवासीयांचे दैनंदिन जीवन विस्कळीत केले गेले, तरीही पणजीवासीय गप्प होते. त्या उलट स्मार्ट सिटीअंतर्गतचे काम रायबंदरमध्ये पोहोचले आणि तेथील रस्त्यांची दैना झाली. यावरून रायबंदरवासीयांनी तेथील नगरसेवकांना हैराण करून सोडले. आता १५ दिवसांत रस्ते दुरुस्त न केल्यास रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर लगेच युद्धपातळीवर काम सुरू केल्याची छायाचित्रे व्हायरल झाली आहेत. यावरून एक गोष्ट सिद्ध झाली, की जोपर्यंत लोक रस्त्यावर उतरून सरकारला कामे पूर्ण करण्याची मुदत देणार नाहीत, तोपर्यंत काहीही होणार नाही. पणजीवासीयांना जे शक्य झाले नाही, ते रायबंदरवासीयांनी करून दाखवले, अशी चर्चा आहे. ∙∙∙

मतदारांचे प्रेम रवी पात्रावांना अधिक

फोंड्याचे पात्राव रवी नाईक यांच्या वाढदिनी अनेकांनी उपस्थिती लावली. त्यात फोंड्यातील नागरिकांचा भरणा अधिक होता. शेवटी ज्या मतदारसंघातून निवडून आलो, त्या मतदारसंघातील लोकांचे प्रेम हे असावेच लागते आणि ते प्रेम आणि आस्था रवी पात्रावांवर असल्याचे मतदारांनी दाखवून दिले आहे. उद्या कदाचित रवी नाईक विधानसभा निवडणुकीत उतरणारही नसतील, पण त्याचा लाभ त्यांचे पुत्र रितेश नाईक यांना होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळेच तर पात्रावांच्या वाढदिनाला उच्च पदस्थापासून ते सर्वसामान्य नागरिकांनी लावलेली उपस्थिती बोलकी ठरली आहे. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire: विजय सरदेसाई आपणाविरोधात आरोप करतात आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत सरदेसाईंच्या संंपर्कात राहातात कसे?
खरी कुजबूज; दोस्त, दोस्त ना रहा!

मेगा प्रकल्पांवर ‘आरजी’ गप्प

‘आरजी’ पक्षाने राज्यातील मेगा प्रकल्पांविरोधात मोर्चा उघडला होता, परंतु लोकसभा निवडणूक झाल्यापासून आरजी प्रमुख मनोज परब सायलेंट मोडमध्ये गेल्याचे दिसते. आरजी कार्यकर्त्यांना विचारल्यास मनोजराव थकले असून ते विश्रांती घेत असल्याचे सांगितले जाते. या दरम्यान बरेच काही घडल्याने स्वतः आरजीचे आमदार वीरेश बोरकर यांच्या सांतआंद्रे मतदारसंघातील मेगा प्रकल्पाविरोधात आरजी आणि आमदारही मौन बाळगून असल्याचे आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून केले गेलेत. तरीही आरजीकडून प्रत्युत्तर आले नाही. आरजी गप्प असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांची कोंडी होत असल्याची चर्चा आहे.

Khari Kujbuj Political Satire: विजय सरदेसाई आपणाविरोधात आरोप करतात आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत सरदेसाईंच्या संंपर्कात राहातात कसे?
खरी कुजबुज: रवींचे ‘एका दगडात दोन पक्षी’

सीमा नाक्यांवरच कडक तपासणी करा

गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची पोलिसांकडून वाहन तपासणीच्या नावाखाली जी सतावणूक होते, त्याचा भांडाफोड आमदार मायकल लोबो यांनी केला असून त्यानंतर आता जो तो त्याबद्दल आवाज उठविताना दिसत आहे. केवळ पर्यटकांचीच नव्हे, तर परराज्यांतील मालवाहू वाहने व टॅंकरवाले यांनाही म्हणे हाच अनुभव गोव्यात येतो व त्यामुळे बहुतेक वाहनचालक गोव्यात जायचे म्हटले की नाक मुरडतात असा अनुभव आहे. गोवा वगळता अन्य कुठेच म्हणे असा अनुभव येत नाही. ते सांगतात त्याप्रमाणे गोव्यात प्रवेश केला की प्रत्येक तालुक्याच्या हद्दीत पोलिस त्यांना अडविण्यासाठी टपून बसलेले असतात. त्याऐवजी सीमा नाक्यावर तपासणी करून प्रवेश दिला जावा, नंतर पुन्हा अडविण्यात येऊ नये. कारण चोरमार्गाने काही प्रवेश करता येत नाही. यास्तव एकदा तपासून प्रवेश दिला, तर त्यांचा पुढचा प्रवास सुकर होईल व विनाकारण कालापव्यय होणार नाही, पण गोव्यात अशी व्यवस्था होणे कठीण आहे असे त्यांना वाटते. कारण तसे झाले तर पोलिसांना आणखी कामच उरणार नाही, नाही का रे भाऊ. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com