
मडगाव: गोव्यात राजकारणी आणि काही गुन्हेगार यांची भ्रष्ट युती असून त्यांना गोव्यातील पोलिसांचीही साथ आहे, असा आरोप गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला. सुलेमान खान याच्या व्हिडीओने ते उघड केले आहे.
काही राजकारणी गोव्यातील (Goa) जमिनी लाटण्यासाठी गुन्हेगार आणि पोलिस यांचा कसा वापर करतात हे त्यातून स्पष्ट होत आहे. गोव्यातील कायदा व सुव्यवस्था संपूर्णपणे कोसळलेली आहे, हेच त्यातून दिसून आलेले आहे, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे. भू बळकाव प्रकरणी फरार आरोपी सुलेमानच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया व्यक्त करताना सरदेसाई यांनी, गोव्यात गुन्हेगारांना राजकारण्यांचे कसे अभय आहे हे स्पष्ट होते,असे सांगितले.
जमीन बळकाव प्रकरणाची चौकशी करण्यासाठी न्या. जाधव यांच्या नेतृत्वाखाली जो आयोग नेमला होता, त्या आयोगाचा अहवाल वाचल्यावर या घोटाळ्यात कोण कोण आहेत हे कळून चुकते. या सर्वच प्रकरणांची जबाबदारी मुख्यमंत्री प्रमाेद सावंत (CM Pramed Sawant) यांच्यावर येत असल्याने त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा गोवा आणखी गुन्हेगारीच्या खाईत लोटला जाईल, असे सरदेसाई यांनी एका व्हिडिओद्वारे म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.