

पणजी: हडफडे येथील क्लबमध्ये पार्टी सुरु असताना लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू झाला. बर्च बाय रोमिओ लेन या वादग्रस्त शनिवारी रात्री बाराच्या सुमारास ही घटना घडली. क्लबमध्ये संगीत कार्यक्रम सुरु असताना इलेक्ट्रीक फायर वर्कनंतर ही घटना घडली. याप्रकरणी क्लबच्या चार व्यवस्थापकांना अटक करण्यात आली आहे.
बर्च बाय रोमिओ लेन या वादग्रस्त क्लबमध्ये वीकेंड पार्टी सुरु असताना पहिल्या मजल्यावर आग लागली. यावेळी क्लबमध्ये खूप गर्दी होती. क्षणातच आगीने रौद्ररुप धारण करत संपूर्ण क्लबला कवेत घेतले. आगीचे प्रचंड मोठे लोळ हवेत गेले.
यात २५ जणांचा मृत्यू झाला असून, सहाजण जखमी झाले आहेत. काहींचा आगीत होरपळून तर अनेकांच्या धुराने गुदमरुन मृत्यू झाला. या घटनेबाबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत, पंतप्रधान मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
क्लबला लागलेल्या आगीत क्लबचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. क्लबचे छत कोसळले असून, आतील साहित्य जळून खाक झाले आहे. क्लबच्या भींती धुराळे काळ्या पडल्या आहेत. आगीत उध्दवस्त झालेल्या बर्च बाय रोमिओ लेन या वादग्रस्त क्लबचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.
दरम्यान, बर्च बाय रोमिओ लेन या वादग्रस्त क्लब वादग्रस्त असून, कारवाईसाठी त्याला नोटीस बजाविण्यात आली होती. मुख्यमंत्र्यानी या घटनेचा सखोल तपास करण्याचे आदेश दिले आहेत. घटनेची दंडाधिकारी चौकशी करण्याचे आदेश सावंत यांनी दिले आहेत.
या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी अंतर्गत दोन लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
दंडाधिकारी अंकित यादव या संपूर्ण घटनेची चौकशी करणार आहेत. सात दिवसांत याप्रकरणी अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत. तसेच, नाईटक्लबचे ऑडिटही महसूल सचिवांच्या अध्यक्षतेखाली केले जाणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.