
पणजी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे उद्यापासून (ता. २०) तीन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर येत आहेत. विविध शासकीय व सामाजिक उपक्रमांत ते सहभागी होणार आहेत.
दुपारी २ वाजता दाबोळी विमानतळावर त्यांचे आगमन होईल. तेथून ते थेट दोनापावला येथील राजभवन गाठतील. २१ रोजी मुरगाव बंदराला भेट, २२ रोजी राजभवन येथे ‘चरक-आयुर्वेदाचे जनक’ आणि ‘सुश्रुत-शस्त्रक्रियेचे जनक’ या पुतळ्यांचे लोकार्पण करतील. त्यानंतर ते जुने गोवा येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या केंद्रीय किनारी कृषी संशोधन संस्थेला भेट देणार आहेत.
काही रस्त्यावर वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. वाहनचालकांनी व नागरिकांनी योग्य सहकार्य करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
राष्ट्रीय महामार्ग-६६ जीएमसी बांबोळीपासून झुआरी पुलावरून कुठ्ठाळी चौकातून वास्कोकडे जाणारा रस्ता, राष्ट्रीय महामार्ग ३६६ - कुठ्ठाळी चौक ते चिखली चौक तेथून दाबोळी विमानतळ, दाबोळी विमानतळ ते हंस गेट तेथून वरुणपुरी मार्गे सडा चौक, मुरगाव बंदर प्राधिकरणाकडे. जीएमसी ते एनआयओ चौकापर्यंत गोवा विद्यापीठ रस्ता. मेरशी चौक ते जुना बायपास (राष्ट्रीय महामार्ग-७४८).
पुढील रस्त्यावर कोणत्याही प्रकारची वाहने उभी करता येणार नाही. मेरशी चौक ते ओल्ड गोवा बायपास (जुना राष्ट्रीय महामार्ग- ७४८). राष्ट्रीय महामार्ग-६६ जीएमसी ते बिर्ला टायटन चौक. कुठ्ठाळी चौक ते चिखली चौक, तसेच दाबोळी विमानतळ चौक ते राष्ट्रीय महामार्ग ३६६. बिर्ला क्रॉस चौक ते सडा चौकापर्यंत.
शंकर मंदिर ते मुरगाव बंदर प्राधिकरणाचे प्रशासकीय कार्यालय, एमपीए प्रशासकीय कार्यालय ते सिने एलमॉन्त थिएटर, एमपीए प्रशासकीय कार्यालय ते दीप विहार हायस्कूल सडा वास्को, राष्ट्रीय महामार्ग ६६- टायटन चौक ते पणजीच्या दिशेने. राष्ट्रीय महामार्ग- ५६६ - बिर्ला क्रॉस चौक ते वरुणपुरी– सडा चौक, एमपीए. राष्ट्रीय महामार्ग ३६६-कुठ्ठाळी चौक ते चिखली चौक, दाबोळी विमानतळ, राष्ट्रीय महामार्ग ७४८- मेरशी चौक ते ओल्ड गोवा बायपास. दाबोळी विमानतळाकडे येण्यासाठी पर्यायी रस्ते- पणजी, मडगाव, फोंडा ची वाहने बिर्ला क्रॉस चौकातून येऊ शकतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.