वेर्णा रहिवाशांची पाण्यासाठी वणवण, निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा

महिलांनी हातात घागर तसेच मोठे पाण्याचे ड्रम घेऊन मुख्य रस्त्यावर ठिय्या मांडला
Verna residents water Problem
Verna residents water ProblemDainik gomantak
Published on
Updated on

झुआरिनगर बीर्ला गृहनिर्माण वसाहतीतील रहिवाशांची पाण्यासाठी आणीबाणी. गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ झुआरी भागात पाणी येत नसल्याने बुधवारी नागरिकांनी रस्त्यावर उतरून सुमारे दीड तास रस्ता रोको आंदोलन केले. पोलिसांनी मध्यस्थी करून आंदोलकांना रस्ता मोकळा करण्यास भाग पाडले. येत्या दोन दिवसात पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर येणार्‍या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालून मतदान न करण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.

राज्यात सध्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्यासाठी लोक वणवण फिरत आहे. रात्रीचे दिवस करून पाण्याची वाट पाहत बसले तरी पाण्याचा एकही थेंब मिळत नसल्याने कित्येक ठिकाणी लोकांचे पाण्यासाठी हाल झाले आहे. स्थानिक आमदार मंत्र्यांकडून फक्त आश्वासनांच्या फैऱ्या सोडल्या जात असल्याचे लोकांकडून आरोप केले जात आहे. सरकारने (Government) जाहीर केलेली फुकट पाण्याची (water) योजना लोकांना भरमसाठ बिले देऊन तसेच अनियमित पाणीपुरवठा ही फोल ठरली असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

Verna residents water Problem
मतभेद मिटले, रोयोलांचा टोनींना पाठिंबा

दरम्यान झुआरीनगर बिर्ला भागातील गृहनिर्माण वसाहतीत गेले सहा महिने पाण्याचा एकही थेंब मिळत नसल्याने येथील नागरिकांनी आज आंदोलनाचा पवित्रा घेऊन रस्त्यावर उतरले. येथील बीर्ला मिनरा मशिद समोरील मुख्य रस्त्यावर झुआरी नगर भागातील लोकांनी उतरून सुमारे दीड तास रास्ता रोको आंदोलन केले. महिलांनी हातात घागर तसेच मोठे पाण्याचे ड्रम घेऊन मुख्य रस्त्यावर ठिय्या मांडला. अचानक पुकारलेल्या आंदोलनाची पोलिसांनी कल्पनाही दिली नव्हती. त्यामुळे रस्ता अडविल्याने वाहतूक रहदारीवर मोठा परिणाम झाला. अर्ध्या तासाच्या अंतराने पोलीस (police) घटनास्थळी धावून आले. मात्र आंदोलक रहिवाशांनी आपल्या निर्णयावर ठाम राहिले. जोपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही मार्ग मोकळा करणार नाही असाच पवित्रा या आंदोलकांनी घेतला.

दरम्यान घटनास्थळी वेर्णा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक डायगो ग्रेशियस, उपनिरीक्षक श्रीधर कामत, प्रविण शिमेपुरूषकर, प्रियका नाईक आदी पोलीस दाखल झाले. त्याने आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ते त्यांना जुमानत नव्हते. नंतर दीड तासाने पोलिसांनी समजूत काढल्याने आंदोलकांनी मिनरा मिश्जद समोरील मुख्य रस्ता मोकळा केला. तसेच त्यांच्या मागणीनुसार घटनास्थळी सार्वजनिक बांधकाम पाणी विभागाच्या अभियंत्यांना नरेश पैगिणकर यांना पाचारण करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी अभियंत्याला घेराव घालून जाब विचारला. यावेळी घटनास्थळी मुरगाव तालुका पोलिस उपअधीक्षक शेख सलिम, कुठ्ठाळीची निर्वाचन अधिकारी जेनिफर फर्नाडीस दाखल झाले.

Verna residents water Problem
भाजप सरकार हे फक्त भ्रष्टाचाराने भरलेले सरकार; गिरीश चोडणकर

जमा झालेले नागरिक ऐकण्याच्या परिस्थिती नव्हते. मग पोलिसांनी अभियंते नरेश पैंगीणकर,तात्रिक अभियंता मोहन नाईक आंदोलन करत्यांचा मुख्य रहिवाशाला बाजूला घेऊन अभियंत्याने सविस्तर माहिती दिली. मात्र लोक आपल्या एकाच मागणीवर ठाम राहिले. जोपर्यंत दोन दिवसात पाण्याचा प्रश्न सुटत नाही. आम्ही निवडणुकीवर बहिष्कार घालून मतदान करणार नसल्याचा इशारा येथील आंदोलन आंदोलनकर्ते रहिवाशांनी दिला आहे. आपण यावर वरिष्ठांशी चर्चा करून पाण्याचा प्रश्न सोडविणार असल्याचे आश्वासन अभियंते पैंगीणकर यांनी दिल्याने आंदोलन कर्त्यांनीनी माघार घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com