भाजप सरकार हे फक्त भ्रष्टाचाराने भरलेले सरकार; गिरीश चोडणकर

आम्ही शेतकऱ्यांसाठी अनेक योग्य त्या योजना राबवणार; गिरीश चोडणकर
Girish Chodankar
Girish ChodankarDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

ताळगाव मतदार संघातील जनतेच्या समस्या लक्षात घेत कॉंग्रेस नेते गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी आज पत्रकार परिषद घेत काही योजना त्यांनी जनतेसमोर मांडल्या आहेत. यात प्रामुख्याने गेल्या 20 वर्षांपासून रखडलेल्या ताळगाव मतदार संघाचा विकास व्हावा यासाठी, पक्षातील अनेक नेत्यांनी एकत्र येत हा जाहीरनामा तयार केला आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. भाजपने ताळगावच्या जनतेचा विश्वास घात केला आहे. यात प्रामुख्याने बाबुश मोंसरात यांचा समावेश आहे. भाजप नेत्यांमध्ये भ्रष्टाचार करण्याची स्पर्धा गेल्या 10 वर्षात पाहायला मिळत आहे. त्यामुळे गोव्याचा विकास खुंटला आहे. तसेच भाजपमधील अनेक नेत्यांनी पक्ष बदलले आहेत. त्यामुळे जनतेने भाजपच्या (BJP) नेत्यांवर विश्वास ठेऊ नये.

Girish Chodankar
मुरगाव तालुक्यातील चारही मतदारसंघातून 'हे' 33 उमेदवार रिंगणात

आम्ही शेतकऱ्यांसाठी अनेक योग्य त्या योजना राबवणार आहे, कारण शेतकऱ्यांवर सरकार अवलंबून आहे. भाजप सरकार हे फक्त भ्रष्टाचाराने भरलेले सरकार आहे. आम्ही अस न करता ताळगावच्या जनतेला वीज आणि पाण्याच्या अडचणीपासून सोडवणार आहे, तसेच एक मोठे मार्केट देखील आम्ही जनतेसाठी ताळगावमध्ये उभारणार आहोत अस मत त्यांनी यावेळी मांडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com