Goa Latest Accident News
Accident NewsDainik Gomantak

Verna Accident: वेगवान कारने 2 तरुणींना उडवले, एक जागीच ठार तर दुसरी गंभीर जखमी; वेर्णा येथे दुर्दैवी अपघात

Goa Accident Death: वेर्णा औद्योगिक वसाहतीमध्ये आज सकाळी कामाला जाणाऱ्या दोन युवतींसाठी एक कार ‘काळ’ बनून आली. रस्ता ओलांडताना कारने या दोघींना जोरदार धडक दिली.
Published on

वास्को : वेर्णा औद्योगिक वसाहतीमध्ये आज सकाळी कामाला जाणाऱ्या दोन युवतींसाठी एक कार ‘काळ’ बनून आली. रस्ता ओलांडताना कारने या दोघींना जोरदार धडक दिली. यात अनिषा सतीश बोरकर (वय २३ वर्षे, रा. केपे) ही युवती जागीच ठार झाली, तर अक्षता उदय नाईक (वय २३ वर्षे, मूळ कारवार) ही गंभीर जखमी झाली. तिच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी कारचालक जोनाथन परेरा (वय १९ वर्षे, रा. आगशी) याच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोनाथन हा वेर्णा येथील पाद्री कोसेसांव महाविद्यालयात शिकतो. परीक्षा देण्यासाठी तो कारने शनिवारी सकाळी घराकडून महाविद्यालयाकडे निघाला होता.

सव्वाआठच्या सुमारास तो वेर्णा औद्यगिक वसाहतीसमोरच्या महामार्गावरून जात होता. त्यावेळी हा अपघात घडला. या अपघातानंतर घाबरलेला जोनाथन थेट वेर्णा पोलिस स्थानकात गेला. त्याने घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली.

Goa Latest Accident News
Margao Bus Accident: रस्ता ओलांडताना खासगी बसची धडक, ज्येष्ठ नागरिक ठार; मडगावातील दुर्दैवी घटना

अनिषा आणि अक्षता या वेर्णा औद्योगिक वसाहतीतील एका फार्मास्युटिकल्स कंपनीत कामाला आहेत. वेर्णा पोलिसांनी पंचनामा केला. याप्रकरणी पोलिस निरीक्षक आनंद शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वेर्णा पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Goa Latest Accident News
Dabolim Accident: कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे आणखी एक बळी! उड्डाणपुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून दुचाकीस्वार ठार

अन् क्षणात दोघी रस्त्यावर आपटल्या

जोनाथनच्या वेगवान कारची धडक रस्ता ओलांडणाऱ्या अनिता आणि अक्षता यांना बसल्याने त्या दोघी रस्त्यावर जोरात आपटल्या. यावेळी अनिषा जागीच मरण पावली, तर अक्षता गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारासाठी गोमेकॉत नेले. तिच्यावर उपचार सुरू आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com