Verca: राष्ट्रीय महामार्ग, साळ नदीवरील जेटीला वार्का ग्रामसभेत विरोध; सरकार परस्‍पर निर्णय घेत असल्‍याबद्दल नाराजी

Verca Gramsabha: वार्का येथून जाणारा राष्ट्रीय महामार्ग व साळ नदीवरील प्रस्तावित जेटीला विरोध करणारे ठराव वार्का ग्रामसभेत मंजूर करण्यात आले.
Verca Gramsabha
VercaDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: वार्का येथून जाणारा राष्ट्रीय महामार्ग व साळ नदीवरील प्रस्तावित जेटीला विरोध करणारे ठराव आज वार्का ग्रामसभेत मंजूर करण्यात आले. कचरा व्यवस्थापनावरसुद्धा यावेळी चर्चा करण्यात आली. सरकार परस्‍पर निर्णय घेत असल्‍याबद्दल ग्रामसभेत नाराजी व्‍यक्त करण्‍यात आली.

सरपंच फ्लाविया बार्रेटो यांनी सांगितले की, वार्का येथून राष्ट्रीय महामार्ग जात असल्‍याचे आम्‍हाला कळविण्यात आले आहे. मात्र तो कसा व कोणत्‍या बाजूने जाईल याचा आराखडा आमच्याकडे नाही. आम्ही या राष्ट्रीय महामार्गाला विरोध करणार आहोत. रस्त्याच्या बाजूला असलेल्‍या बेकायदेशीर बांधकामांची यादी पाठविण्यात सांगण्यात आले आहे.

Verca Gramsabha
Sal Gade Festival: गडोत्सवाची धामधूम आजपासून, साळ देवस्थानतर्फे जय्यत तयारी, भाविकांची अलोट गर्दी लोटणार

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही बांधकामे हटविण्याचा आदेश आहे. त्यासाठी आम्ही खास ग्रामसभा बोलावणार असून त्याबद्दलही चर्चा केली जाईल, असे सरपंच बार्रेटो यांनी सांगितले.

दरम्‍यान, साळ नदीवरील जेटीलाही आमचा विरोध आहे. ही जेटी नेमकी कुठे प्रस्तावित केली आहे हेसुद्धा आम्हाला माहीत नाही, असे सरपंच बार्रेटो यांनी सांगितले.

Verca Gramsabha
Sal River Jetty: साळ नदीवर 'जेटी'चा प्रस्ताव नाही! सिक्वेरांनी विरोधकांच्या आरोपातली काढली हवा

कचरा व्यवस्थापन विषयावरही चर्चा

ग्रामसभेत कचरा व्यवस्थापनावरही चर्चा करण्यात आली. ओला व सुका कचरा दारोदारी जाऊन नियमित गोळा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्याचबरोबर रस्‍त्‍याच्‍या बाजूचा व ‘हॉट-स्पॉट’मधील कचरा नियमित उचलण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा जाहीर करण्यात आली आहे. गाव स्वच्छ ठेवण्याला आमचे प्राधान्‍य आहे, असे सरपंच बार्रेटो यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com