Sal Gade Festival: गडोत्सवाची धामधूम आजपासून, साळ देवस्थानतर्फे जय्यत तयारी, भाविकांची अलोट गर्दी लोटणार

Gade Festival: प्रसिद्ध गडे उत्सवास उद्या १४ मार्चपासून सुरवात होणार असून १६ मार्च रोजी सांगता होणार आहे.
Sal Gade Festival
Sal Gade FestivalDainik Gomantak
Published on
Updated on

साळ: प्रसिद्ध गडे उत्सवास उद्या १४ मार्चपासून सुरवात होणार असून १६ मार्च रोजी सांगता होणार आहे. या उत्सवासाठी हजारो भाविक साळ येथे दाखल होणार असल्याने ग्रामस्थांनी जय्यत तयारी केली आहे.

यादरम्यान होळी दिवशी सकाळी ११.०० च्या सुमारास सुनील कमलाकांत पळ (बोर्डे - डिचोली) यांच्या ‘घोंड्या - बोर्डे’ या बागायतीतील अंदाजे ६५ फूट लांब कोकम (भिरण) झाडाची विधीवत पूजा करून ते तोडण्यात आले.

पुरोहित सदाशिव गाडगीळ व यशवंत गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली गडे सदस्य मधुकर बाबुली परब त्यानंतर गडे उत्सवासाठी होळी म्हणून बागायतीतील झाड श्री चरणी अर्पण करणारे सुनील कमलाकांत पळ (बोर्डे - डिचोली) व हनुमंत सखाराम घाडी (होळी तोडणारे) यांच्या हस्ते झाडाची विधिवत पूजा करण्यात आली.

त्यानंतर सार्वजनिक गाऱ्हाणे घालण्यात आले. यावेळी अनेक गडे सदस्य, राऊत व परब महाजन, पंचक्रोशीतील युवक हजर होते. त्यात श्री महादेव भूमिका देवस्थानचे अध्यक्ष कालिदास राऊत व सचिव विशाल परब यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

ही होळी बोर्डे, डिचोली, मुळगाव, नानोडा, कासारपाल, वडावलमार्गे साळला संध्याकाळी कार्यक्रम स्थळी ढोल ताशाच्या गजरात आणि रंग उधळत आणण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी भाविक सुवासिनींनी विधिवत पूजा करून खणा नारळाची ओटी भरली.

Sal Gade Festival
Goa Politics: "पांडुरंग मडकईकरांचा 'तो' लाचखोरीचा आरोप खोटा, सावंत यांच्या नेतृत्वाखाली सरकारचे इमानदारीने काम", खासदार अरुणसिंह यांचा निर्वाळा

मध्यरात्री रोमट आल्यानंतर गड्यांचे गाऱ्हाणे घालतात, नंतर ढोल ताशे वाजवायला सुरवात होते. गडे पडू लागल्यानंतर होळीला पाच फेऱ्या घालून करूल्या आणण्यासाठी मंदिराच्या पाठीमागील डोंगरापलीकडे श्रीकरवेश्वर ठिकाणी जातात. वाटेतच देवदेवता मशाल पेटवून त्यांचे स्वागत करतात. त्यानंतर या मशालीमागून गडे चालू लागतात. परत येताना देवता या काही गड्यांना लपवतात व त्याच रात्री लपवलेल्या गड्यांना परत गड्याकडे देतात हे दृश्य पाहण्यासाठी हजारो भाविक या गड्यामागून धावतात.

भाविकांचे संरक्षण करण्यासाठी धोक्याच्या ठिकाणी गडे उभे केले जातात आणि गडे देण्याचे अनोखे दृश्य बघण्यासाठी भाविक पळतात असे तिन्ही रात्री गडे देण्याचा कार्यक्रम चालतो.शेवटच्या रात्री स्मशानभूमीत जाऊन तिरडीचे दांडे, बुजगावणी, हुसकीच्या डहाळ्या, पाणी तापवण्यासाठी असणारे मातीचे मोठे मडके, जळती लाकडे घेऊन गडे होळीपाशी येतात.

Sal Gade Festival
Goa Mining: 12 पैकी 9 खाणपट्ट्यांत प्रत्यक्षात खाणकाम सुरू होणार, केंद्रीय मंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर CM सावंतांची मोठी घोषणा

पोलिसांना सहकार्य करा

गडे उत्सवासाठी येणाऱ्या भाविकांनी धुमासेमार्गे रात्री दहानंतर प्रवेश करू नये, तर कासापालमार्गे येणाऱ्या भाविकांनी रात्री ११.०० च्या नंतर येऊ नये. गडे उत्सवासाठी तैनात पोलिस व वाहतूक पोलिसांना भाविकांनी योग्य ते सहकार्य करावे, असे साळ देवस्थान व गड्यांनी आवाहन केले आहे.

गडे पाहण्यास होणार गर्दी

होळी उभारल्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्रीपासून गडे पडण्यास सुरवात होते. साळातील गडे उत्सव हा गोवा, महाराष्ट्र व कर्नाटकात प्रसिद्ध आहे. अदृश्य रूपातील देवदेवता व दृश्य रूपातील गडे यांचा हा रात्रीचा चालणारा खेळ पाहण्यास हजारो भाविक येतात.

सुरुवातीस ६४ गडे होते आता त्यांची संख्या अंदाजे ४५ असून श्री महादेवाने या खेळाला सुरवात करून श्री भूमिका देवीच्या हाती सर्व सूत्रे दिली, तर श्री माडयेश्वर देव त्याच्या अधिकाराखाली हा खेळ चालू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com