भाजीविक्रेत्‍यांकडून मापात ‘खोट’ ग्राहकांची होतीये लुबाडणूक

मडगावातील प्रकार : रस्‍त्‍यांच्‍या बाजूला बेकायदा विक्री
Vegetable sellers in Margao
Vegetable sellers in MargaoDainik Gomantak
Published on
Updated on

फातोर्डा: राज्यात भाजीपुरवठ्याची कमतरता भासत आहे. मागणी खूप आणि पुरवठा कमी अशी स्‍थिती आहे. अशा परिस्‍थितीत काही भाजीविक्रेत्यांकडून मडगाव आणि परिसरात रस्‍त्‍याच्‍या बाजूला बसून चढ्या दराने विक्री करण्यात येत आहे. त्‍यामुळे रस्‍त्‍यावर वाहतुकीची कोंडी तर होतेच, शिवाय अपघातांची शक्‍यता वाढली आहे. शिवाय लोकांना नाईलाजाने जास्‍त पैसे देऊन भाजी खरेदी करावी लागतेय. ही एक प्रकारे लुबाडणूकच आहे. (Vegetable sellers are deceiving consumers in margao)

Vegetable sellers in Margao
Goa Election 2022: महिलांचे सबलीकरण हेच आमचे प्रमुख ध्‍येय: मनोज परब

रस्‍त्‍याच्‍या बाजूला बसून विक्री करणाऱ्यांच्‍या काही प्रमुख भाज्यांच्या दरात 5 ते 15 रुपयांची तफावत जाणवत आहे. याबरोबरच काही विक्रेत्यांच्या तराजूमध्ये वजनमापात गोलमालही करण्यात येत आहे, अशा ग्राहकांच्‍या तक्रारी वाढू लागल्‍या आहेत. तरीसुद्धा प्रशासनाकडून दखल घेण्यात येत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे

मडगाव Margao येथील गांधी मार्केट Gandhi Market व एसजीपीडीए येथील ठिकाणे भाजीविक्रीची प्रमुख ठिकाणे असली तरी फलोत्पादन महामंडळाच्या गाड्यांव्यतिरिक्त मडगाव व सभोवतालच्‍या परिसरात रस्त्याच्या बाजूला भाजीविक्रीची दालने खुली करून व्यवसाय करण्यात येत आहे. या विक्रेत्‍यांकडे नगरपालिकेचा कोणताही अधिकृत परवाना नाही. याबाबत बोलताना मडगाव नगरपालिकेचे Margao Municipality मुख्यधिकारी आग्नेल फर्नांडिस यांनी सांगितले की, बेकायदेशीर विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येत आहे. अशा विक्रेत्‍यांवर देखरेख ठेवण्यासाठी नगपालिकेचे फिरते पथक कार्यरत आहे. वजन माप खात्याचे अधिकारी अरुण पंचवाडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा बेकायदा विक्रेत्‍यांवर खात्याकडून कारवाई सुरू आहे. तर, लोकांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे विकत घेतलेली भाजी त्‍या वजनाच्‍या मानाने कमीच असते. उलट दर जास्‍त आकारला जातो. किया विक्रेत्यांच्या वजनमाप करणाऱ्या यंत्राची संबंधित अधिकाऱ्यांनी तपासणी करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

Vegetable sellers in Margao
मोले येथील 'त्या' प्रकल्पाचा अभयारण्यातील वन्यजीवांवर वाईट परिणाम
  • गांधी मार्केट परिसरात भाजीची खरेदी केलेल्या विरेश नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, गांधी मार्केट परिसरात दोन किलो कांदे खरेदी केले होते. आमच्या घरी वजनकाट्याने तपासणी केली 325 ग्रॅम कमी कांदे असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले.

आपण गांधी मार्केट परिसरात दोन किलो कांदे खरेदी केले. नंतर आमच्या घरी वजनकाट्याने तपासणी केली असता

325 ग्रॅम कांदे कमी असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. त्‍या विक्रेत्‍याने दरही जास्‍त आकारला. अशा विक्रेत्‍यांवर कारवाईची गरज आहे.

- विरेश नाईक, ग्राहक

  • रस्‍त्‍याच्‍या बाजूला बसून विक्री करणाऱ्या बेकायदेशीर विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येत आहे. अशा विक्रेत्‍यांवर देखरेख ठेवण्यासाठी नगपालिकेचे फिरते पथक कार्यरत आहे. ग्राहकांची फसणवूक होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे.

- आग्नेल फर्नांडिस, मुख्याधिकारी

दरांत 5 ते 15 रुपयांची तफावत

आणखी एका भाजी खरेदी करणाऱ्या ग्राहकाने दिलेल्या माहितीप्रमाणे, त्याचा हॉटेल व्यवसाय असून त्याला रोज भाजीची गरज भासते. ही भाजी प्रमुख बाजारपेठेत उपलब्ध नसल्यास इतर ठिकाणाहून घ्यावी लागते. मात्र काही भाजीविक्रेत्यांकडून भाजीचा भाव ५ ते १५ रुपये दरांपेक्षा जास्त असतो. या सर्व विक्रेत्यांना समान दर लागू करावा आणि दराची पाटी लावणे बांधनकारक करावे, अशी मागणी त्‍यांनी केली आहे. अन्यथा ही लुबाडणूक अशीच सुरू राहील, असेही तो म्हणाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com