मोले येथील 'त्या' प्रकल्पाचा अभयारण्यातील वन्यजीवांवर वाईट परिणाम

सरकार व प्रदूषण मंडळाला खंडपीठाची नोटीस
Goa wildlife sanctuary
Goa wildlife sanctuaryDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मोले येथील वन्यजीव अभयारण्याच्या क्षेत्राजवळ हॉटमिक्सिंग प्रकल्प सुरू असल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका सादर करण्यात आली आहे. ही याचिका काल सुनावणीसाठी आली असता काही वेळ प्राथमिक सुनावणीनंतर गोवा खंडपीठाने Goa Bench of the Mumbai High Court सरकार तसेच राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच इतर प्रतिवाद्यांना नोटीस बजावून पुढील सुनावणी येत्या 1 फेब्रुवारीला ठेवली आहे. (Adverse effects of hotmixing project at mollem on wildlife in sanctuary)

Goa wildlife sanctuary
Goa Election: भाजप वैफल्यग्रस्त अवस्थेत

मोले येथील एका नागरिकाने ही याचिका सादर केली आहे. हॉटमिक्सिंग प्रकल्प (HotMxing Project) ज्या ठिकाणी सध्या सुरू आहे ता परिसर मोले वन्यजीव अभयारण्यापासून जवळ आहे. त्यामुळे त्याचा परिणाम या अभयारण्यातील वन्यजीवांवर होत आहे. या प्रकल्पाच्या आवाजामुळे तेथील काही वन्यजीव दूर जात आहेत. त्याचा परिणाम या अभयारण्यात असलेल्या प्राण्यांवर होत असून त्यांच्या हालचालींवरही निर्बंध आले आहेत. कायद्यानुसार या अभयारण्याच्या हद्दीपासून सुमारे एक किलोमीटर बफर झोन असतानाही हा प्रकल्प उभारून तेथे काम सुरू आहे.

यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी करून कोणतीच पावले उचलली जात नाहीत. या प्रकल्पामुळे त्याचा परिणाम पर्यावरणावर Environment होत आहे. अभयारण्यातील वन्यजीवही दूर जाण्याची भीती आहे. अशा परिस्थितीत न्यायालयाने हस्तक्षेप करून हा प्रकल्प बंद करण्याचे निर्देश द्यावेत अशी विनंती या नागरिकाने केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com