पणजी: सध्या अनेक जण अनेक पक्षांत बेडुकउड्या मारत आहेत. गोवन रिव्होल्युशनरीच्या (आरजी) उमेदवारांनाही अनेक पक्षांकडून ऑफर्स येत आहेत. पण ते एकनिष्ठ आहेत व गोवेकरांच्या हितासाठी खंबीरपणे उभे आहेत, असे ‘आरजी’चे सर्वेसर्वा मनोज परब Manoj Parab यांनी पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. (Press Conference by Manoj Parab: Empowerment of women one of main goals of Revolutionary Goans)
यावेळी राजेश रेडेकर यांना पणजी मतदारसंघातून व परेश तोरसकर यांना मुरगाव मतदारसंघातून उमेदवारी देण्यात येत असल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच महिलांचे सबलीकरण हे रिव्होल्युशनरी गोवन्सचे Revolutionary Goans प्रमुख ध्येय आहे, असेही परब यांनी स्पष्ट केले.
महिलांना Women दरमहा दोन हजार रूपये किंवा व्यवसाय करायचा असेल तर तीन लाख रूपये देण्यात येतील. तसेच सरकारकडून मदतही करण्यात येईल. विधवा महिलांना व्यवसाय करण्यासाठी 10 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्यात येईल, जेणेकरून त्या स्वतःचा तसेच आपल्या कुटुंबाचा चरितार्थ सुरळीत भागवू शकतील.
‘लाडली लक्ष्मी’ योजनेद्वारे Ladali Laxmi Yojana विवाहासाठी 1 लाख रूपये दिले जातील किंवा 2.5 लाख रूपये उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थिनींना देण्यात येतील. महिलांना स्वसंरक्षाणासाठी प्रशिक्षण दिले जाईल. सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही लावले जातील. तसेच महिलांच्या संरक्षणासाठी मोबाईल ॲप तयार केल्या जातील. त्यांच्या आरोग्य समस्या सोडविण्यासाठी कार्यवाही केलीजाईल. यावेळी सुनयना गावडे यांनीही विचार मांडले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.