Vegetable Price Hike: उष्णतेमुळे बाजारात महागाईचा तडाखा; पणजीसह राज्यात भाज्यांचे दर भडकले, लिंबू-शहाळ्याला मागणी वाढली

Goa Vegetable Prices: जून महिना संपण्यास अवघे दहा दिवस शिल्लक असतानाही राज्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही.
Vegetable Price Hike
Goa Vegetable PricesDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: जून महिना संपण्यास अवघे दहा दिवस शिल्लक असतानाही राज्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे उष्णता आणि उकाड्यात वाढ झाली असून नागरिक त्रस्त झाले आहेत. वाढत्या उष्म्यामुळे शरीराला थंडावा देणाऱ्या लिंबू, शहाळे आणि विविध फळांच्या मागणीत वाढ झाली आहे. त्याचबरोबर बाजारातील काही फळभाज्यांच्या दरातही मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

पणजी बाजारासह राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये बिन्स १८० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात असून शिमला मिरचीचा दर १३० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचला आहे. गाजर ६५ रुपये प्रतिकिलो दराने विकले जात असून काही ठिकाणी ते ५० रुपयांनाही उपलब्ध आहे. दुसरीकडे कांदा आणि बटाटा यांच्या दरात फारसा बदल नसून ते तुलनेने स्थिर आहेत.

Vegetable Price Hike
Margao Fish Market: मडगाव 'मासळी मार्केट'ची इमारत बांधून वर्ष उलटलं, पण उद्घाटनाला मुहूर्त मिळेना! व्यापारी आणि मच्छीमार संभ्रमात

मागील वर्षभरापासून नारळाचे दर उच्च पातळीवर कायम आहेत. बाजारात लहान आकाराचा नारळ ३५ रुपये तर मध्यम आकाराचा नारळ ५० रुपये प्रतिनग दराने विकला जात आहे. यामुळे गृहिणींच्या घरगुती खर्चात वाढ होत आहे. लसूणही महाग असून तो २५० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे.

दरम्यान, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर काही रानभाज्या बाजारात दाखल होऊ लागल्या आहेत. या भाज्यांना ग्राहकांकडून चांगली मागणी असून त्यांच्या विक्रीत वाढ होत आहे. व्यापाऱ्यांच्या मते, येत्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढल्यास भाज्यांची आवक वाढून काही दर कमी होण्याची शक्यता आहे. मात्र सध्या तरी उष्मा आणि मर्यादित पुरवठ्यामुळे अनेक फळे व भाज्यांचे दर चढेच राहिले आहेत.

Vegetable Price Hike
Panaji Market: पणजी बाजारात पावसाळी साहित्य खरेदीसाठी गर्दी; छत्र्या, रेनकोटच्या दरात वाढ; दुचाकीस्वारांसाठी खास डिझाइन केलेले रेनकोट

फलोत्पादन दर बाजारातील दर

भेंडी ३७ ४०

कोबी ४२ ४५

गाजर ४२ ६०

प्लॉवर ३७ ४०

चिटकी ५३ ६०

बिन्स १३० १८०

मिरची ५० ८०

कांदा ३१ ३५

बटाटा २८ ३८

टॉमेटो ४७ ५०

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com