Panaji Market: पणजी बाजारात पावसाळी साहित्य खरेदीसाठी गर्दी; छत्र्या, रेनकोटच्या दरात वाढ; दुचाकीस्वारांसाठी खास डिझाइन केलेले रेनकोट

Panaji market monsoon shopping crowd: मान्सून केरळात दाखल झाला आहे. आज वा उद्या मान्सून गोव्यात पोहोचेल. दरम्यान, येथील बाजारात पावसाळी साहित्य मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहे.
Panaji Market
Panaji MarketDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मान्सून केरळात दाखल झाला आहे. आज वा उद्या मान्सून गोव्यात पोहोचेल. दरम्यान, येथील बाजारात पावसाळी साहित्य मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहे. रंगीबेरंगी छत्र्या, आधुनिक डिझाइनचे रेनकोट, लहान मुलांचे रेनकोट, दप्तरे, पावसाळी चपला आदी साहित्याने बाजारपेठ सजली आहे.

महिलांसाठी थ्री-फोल्ड आणि डिझायनर छत्र्या, तर पुरुषांसाठी मजबूत व मोठ्या आकाराच्या छत्र्या उपलब्ध आहेत. याशिवाय, दुचाकीस्वारांसाठी खास डिझाइन केलेले रेनकोटदेखील बाजारात पाहायला मिळत आहेत.

Panaji Market
Goa Sports: शालेय क्रिकेट स्पर्धेत 'जीसीए'ची दमछाक! राज्यस्तरीय अंतिम लढती प्रलंबित

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पावसाळी साहित्याच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. अगदी १०० रुपयांपासून १,५०० रुपयांपर्यंत विविध प्रकारचे रेनकोट बाजारात उपलब्ध असून, प्रत्येकजण आपल्या गरजेनुसार रेनकोट व छत्र्या खरेदी करत आहे.

सध्या बाजारात छत्र्या २५० रुपयांपासून ते ७०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. प्लास्टिक शीट आणि ताडपत्रीच्या दरातही काहीशी वाढ झाली आहे. गुणवत्तेनुसार ८० ते १५० रुपये प्रति मीटर दराने प्लास्टिकची विक्री केली जात आहे. अनेकजण छत व खोपीवर प्लास्टिक आच्छादन करण्यासाठी थेट ताडपत्री विक्रेत्यांकडूनच किलोवर खरेदी करत आहेत.

Panaji Market
Goa Crime: स्क्रॅप यार्ड्सवर पोलिसांची धडक कारवाई! 172 जणांची कसून तपासणी

दर्जेदार साहित्याला पसंती

येत्या दोन-तीन दिवसांत पावसाला सुरुवात होईल. त्यामुळे नागरिकांची खरेदीसाठी लगबग वाढली आहे. गेल्या दोन दिवसांपासून बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची, विशेषतः पालकांची आणि नोकरदारांची, मोठी गर्दी दिसून येत आहे. पावसापासून बचावासाठी नागरिक आतापासूनच दर्जेदार साहित्याला पसंती देत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com