Bicholim तील खाण कामगारांची मुख्यमंत्र्यांकडे 'आर्त हाक'

Amona: कामगारांनी काल साखळी येथे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली.
Pramod Sawant
Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

Amona: खाणी सुरु झाल्यानंतर खाणीवर काम मिळेपर्यंत सेझाच्या (वेदांता) आमोणे Amona येथील पिग आयर्न प्रकल्पात (Pig Iron Project) आम्हाला सामावून घ्यावे, अशी आग्रही मागणी सेझाच्या डिचोलीतील कामगारांनी केली आहे. बेकारीची टांगती तलवार असलेल्या सेझाच्या डिचोलीतील अस्वस्थ कामगारांनी काल साखळी येथे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली.

Employees Union of Sesa Mining ‘एम्प्लॉयीज युनियन ऑफ सेसा मायनिंग’ संघटनेचे अध्यक्ष निलेश कारबोटकर, सचिव किशोर लोकरे, खजिनदार नारायण गावकर, दीपक पोपकर, राजेश गावकर, महेश होबळे, अनिल सालेलकर, संजय मांद्रेकर आदींनी डिचोलीतील 200 हून अधिक कामगारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपली कैफियत मांडली. यावेळी डिचोलीचे आमदार चंद्रकांत शेट्ये यांचीही उपस्थिती होती.

Pramod Sawant
Goa Curlies Club: एडविनचेही खास कॉटेज जमीनदोस्त

‘प्रकल्पात काम द्या’ : खाण (Mines) व्यवसाय बंद असला, तरी सेझाचा आमोणे येथील पिग आयर्न प्रकल्प सुरु आहे. या प्रकल्पात दीड हजारहून अधिक कंत्राटी कामगार आहेत, असा दावा सेझाच्या खाण कामगारांनी केला आहे. खाणी कधी सुरु होईल तेव्हा होऊ द्या. तोपर्यंत आम्हाला पिग आयर्न प्रकल्पात काम द्या, अशी मागणी आता गळीतगात्र बनलेल्या कामगारांनी केली आहे. सेझाच्या कामगारांना कंपनी व्यवस्थापनाने दिलेल्या रिट्रेचमेंट (Retrenchment) नोटीसीची मुदत येत्या 5 ऑक्टोबरला संपत असून, या कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे.

Pramod Sawant
Goa Lok Sabha Elections| भाजपात अनेकांचे शर्थीचे प्रयत्न सुरू; जोरदार मोर्चेबांधणी

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

कंपनी व्यवस्थापन आणि कामगार आयुक्त यांच्याबरोबर बैठक घेऊन या मागणीसंदर्भात तोडगा काढण्यासाचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी कामगारांना दिले आहे. पुढील आठवड्यात बैठक होणार असल्याचे संकेतही मिळाले आहेत. दुसऱ्या बाजूने डिंगणे-सुर्ल येथील सेझाच्या कामगारांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मांडले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com