Goa crime: वास्कोत 'फरार' सराफाला महिलांनी पकडले! पोलिस ठाण्यात केले हजर; कमी व्याजदराच्या आमिषाने करायचा फसवणूक

Vasco Gold Loan Fraud: वास्कोच्या सडा परिसरातील संतप्त महिलांनी फसवणूक करणाऱ्या सराफाला स्वतः पकडून थेट वास्को पोलिस ठाण्यात आणल्याची घटना बुधवारी घडली.
Vasco Gold Loan Fraud
Goa crimeDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: वास्कोच्या सडा परिसरातील संतप्त महिलांनी फसवणूक करणाऱ्या सराफाला स्वतः पकडून थेट वास्को पोलिस ठाण्यात आणल्याची घटना बुधवारी घडली. भीमप्पा चलवादी असे संशयित सराफाचे नाव असून, कमी व्याजदरात सोनेतारण कर्ज देण्याचे आमिष दाखवून अनेक महिलांची फसवणूक केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

माहितीनुसार, चलवादी याने स्वतःची बँकिंग व्यवस्था असल्याचा दावा करत अवघ्या ०.६५ टक्के व्याजदराने कर्ज देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे अनेक महिलांनी त्याच्याकडे सोने गहाण ठेवले. कर्जाची संपूर्ण परतफेड करूनही दागिने परत देण्यास त्याने टाळाटाळ केल्याचा आरोप पीडितांनी केला आहे.

Vasco Gold Loan Fraud
Chhattisgarh Woman Assault: आधी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण, मग हात पाय बांधून जबरदस्तीनं मुंडण, अन्...; चार मुलांसमोर नराधम बापाची आईवर क्रूरता

याप्रकरणी मुरगाव पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल असूनही संशयिताविरोधात ठोस कारवाई झाली नसल्याचा महिलांचा आरोप आहे. संशयित फरार असल्याचे सांगितले जात असतानाच तो परिसरात खुलेआम फिरत असल्याने महिलांनी स्वतःच सापळा रचून त्याला पकडले व पोलिस ठाण्यात आणले. पोलिस ठाण्याबाहेर महिलांनी तीव्र संताप व्यक्त करत संशयितावर कारवाईची मागणी केली. संशयिताने लोकांच्या पैशांवर व सोन्यावर २ आलिशान बंगले व इतर मालमत्ता उभारल्याचाही आरोप करण्यात आला.

पोलिसांच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी

महिलांनी पोलिसांच्या निष्क्रियतेवरही तीव्र नाराजी व्यक्त केली. संशयिताविरुद्ध तातडीने अटक करून सर्व पीडितांना त्यांचे दागिने परत मिळावेत, अशी मागणी महिलांनी केली. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून, अनधिकृत वित्तीय व्यवहारांबाबत नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com