

वास्को: सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वास्को परिसरात गुरुवारी मोठी दुर्घटना टळली. मुरगाव बंदराकडे जाणाऱ्या एका कारवर भलेमोठे झाड उन्मळून पडल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले. मात्र, कारमध्ये बसलेला चालक सुदैवाने थोडक्यात बचावला. घटनेनंतर वास्को अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत झाड हटविण्याचे काम केले.
मिळालेल्या माहितीनुसार, कारमधील एक व्यक्ती बंदरात प्रवेशासाठी आवश्यक असलेला पास आणण्यासाठी गेली होती, तर चालक कारमध्येच थांबला होता. त्याचवेळी अचानक झाड कोसळून कारच्या छतावर पडले. प्रसंगावधान राखत चालक खाली वाकल्याने त्याचा जीव वाचला. झाडाचा आकार मोठा असल्याने ते हटविण्यासाठी क्रेनची आवश्यकता भासली.
दरम्यान, नानकनगर-दाबोळी येथे भूस्खलनानंतर मोठे दगड उघडे पडल्याने दोन घरांना धोका निर्माण झाला आहे. माजी नगरसेवक सुदेश भोसले यांनी तलाठी गौतम साळुंके यांच्यासह घटनास्थळी पाहणी केली. तलाठ्यांनी याबाबतचा अहवाल मुरगाव मामलेदार कार्यालयाकडे सादर केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.