Tourism' sector: इन द मिरर ऑफ द अदर

लडाखमधील त्सेरिंग मोटूप सिदधो गोव्यात ‘दुसरा’ बनून हिंडत आहे
Tourism' sector
Tourism' sectorDainik Gomantak
Published on
Updated on

Tourism' sector लेह-लडाख आणि गोवा या दोन प्रदेशांमध्ये टोकाची भिन्नता आहे. एका ठिकाणी उत्तुंग पर्वत आहेत तर दुसऱ्या ठिकाणी क्षितीजापर्यंत पोहोचणारे समुद्राचे पाणी आहे. इतरही काही भौगोलिक, सांस्कृतिक भिन्नता आहेत.

या दोन्ही प्रदेशांमध्ये साम्य जर कुठले असेल तर ते आहे ‘पर्यटन’ क्षेत्र. हे क्षेत्र या दोन्ही प्रदेशात ‘परकीयांचे’ स्वागत करते. परकीय ‘दुसरे’ असले तरी या प्रदेशांना या ‘दुसऱ्या’वर अवलंबून रहावे लागते.

सध्या लडाखमधील त्सेरिंग मोटूप सिदधो गोव्यात ‘दुसरा’ बनून हिंडत आहे. कलेच्या विविध माध्यमांत प्रयोग करणारा त्सेरिंग ‘सुनापरान्त गोवा सेंटर फॉर द आर्टस’ च्या ‘आर्टिस्ट इन रेसिडेंस लॅब’चा कलाकार आहे.

रेसिडेंसीचा भाग म्हणून तो गोव्यात अनेक ठिकाणांना व लोकांना भेटी देत आहे. ‘पर्यटन’च्या संदर्भात, लेह-लडाख आणि गोवा यामधील साम्ये आणि विरोध यांचा वेध घ्यायच्या प्रयत्नात, व्हिडिओ, फोटोग्राफ या माध्यमातून त्याने गोळा केलेल्या कहाण्या तो 13 एप्रिल रोजी ‘सुनापरांत’ मध्ये उपस्थितांसमोर सादर करणार आहे.

‘इन द मिरर ऑफ द अदर’ या कार्यक्रमात, त्यांचे रेसिडेंसीतले मार्गदर्शक शाजेब शेख आणि सुनापरान्तचे लियान्ड्रे डिसौझा यांच्याशी तो संवाद साधेल.

गोव्यासंबंधी घेतलेली छायाचित्रे किंवा व्हिडिओ यांची सांगड आपल्या लडाखी कलाशैलीशी घालून त्सेरिंग वेगळ्या तऱ्हेने अभिव्यक्त होऊ पाहतो. ‘गोवा व लेह-लडाख यांची ती तिरप्या रेषेतली (diagonal) जुळणी असेल’, असे त्यांचे म्हणणे आहे.

Tourism' sector
Ponda News : उपआरोग्य केंद्राचे स्थलांतर करा

आपल्या सादरीकरणासाठी त्सेरींगने ‘सुनापरान्त’मध्ये एका विशेष अवकाशाची निर्मिती केली आहे. त्यात त्याने गोव्याच्या प्रतिमांना, स्वतःचे अन्वयार्थ जोडून मांडले आहे. या जागेत खाद्यपदार्थ तयार करता करता, उपस्थितांसमोर तो आपल्या निर्मितीसंबंधाने बोलेल.

Tourism' sector
'Traditional Goan Foodies': ईस्टर एग्ज

गोव्यातील कहाण्या, संस्कृती आणि अन्न यासंबंधाने तो आपले अनुभव लोकांसमोर मांडेल. ‘मी गोव्यातील कहाण्या घेऊन जेव्हा माझ्या प्रदेशात जाईन तेव्हा त्या कहाण्यांमधून माझी अभिव्यक्ती, माझी कला वेगळ्या प्रकारे विकसित होईल. प्रदेशांची संस्कृती अशीच ‘दुसऱ्यां’पासून समृध्द होते’ असे तो म्हणतो.

13 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता होणारा हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. ‘इन द मिरर ऑफ द अदर’ 13 ते 15 एप्रिल दरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी 6.30 या वेळात सर्वांसाठी खुले असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com