Khariwada Fish Market : ...तर आम्ही रस्त्यावर मासे विक्री करू! मासळी विक्रेत्यांचा इशारा : नगराध्यक्षांनी दिले कारवाईचे आश्वासन

Vasco Fish Vendors Protest: खारीवाडा येथे घाऊक दराने मासे विक्री बंद न झाल्यास आम्ही रस्त्यावर मासे विक्री करू, असा इशारा मासळी मार्केटातील विक्रेत्यांनी नगराध्यक्ष गिरीश बोरकर यांची भेट घेऊन दिला आहे.
Vasco Fish Vendors Protest
Vasco Fish Vendors ProtestDainiak Gomantak
Published on
Updated on

वास्को: खारीवाडा येथे घाऊक दराने मासे विक्री बंद न झाल्यास आम्ही रस्त्यावर मासे विक्री करू, असा इशारा मासळी मार्केटातील विक्रेत्यांनी नगराध्यक्ष गिरीश बोरकर यांची भेट घेऊन दिला आहे. याप्रकरणी दखल घेत बोरकर यांनी मंगळवारपासून संबंधित घाऊक विक्रेत्यांविरोधात कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. घाऊक व किरकोळ मासेविक्रेत्यांमध्ये गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू आहे. घाऊक मासेविक्रेत्यांविरोधात अधूनमधून कारवाई होते; मात्र पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ अशी परिस्थिती निर्माण होते.

खारीवाडा येथे काहीजण घाऊक दराने (किलोनुसार) मासे विक्री करतात. त्यामुळे तेथे ग्राहकांची गर्दी असते. त्या घाऊक विक्रेत्यांमुळे आमच्या व्यवसायावर मोठा परिणाम होत असल्याचा दावा मासळी मार्केटातील विक्रेते करतात.घाऊक मासेविक्रेत्यांविरोधात कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आल्यानंतरच किरकोळ दराने (वाट्यानुसार) मासे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी त्या मार्केटात व्यवसाय सुरू केला होता.

Vasco Fish Vendors Protest
Goa Heat Wave: उन्हाचा 'कडाका' अन् घामाच्या 'धारा'; मे महिन्याच्या सुरुवातीलाच नागरिक उकाड्याने हैराण, कमाल तापमान 36 अंशांवर

मात्र, त्यानंतर त्या घाऊक मासेविक्रेत्यांविरोधातील कारवाई थंडावली. गेल्या महिन्यात या घाऊक विक्रेत्यांची सोय बायणा येथील मासळी मार्केटात करण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी त्या विक्रेत्यांनी बायणा येथे जाण्यास सहमती दर्शविली होती. मात्र, आता त्यांनी माघार घेतली आहे. बायणा येथे ग्राहक येणार नसल्याचे त्यांचे मत आहे.

आजपासून कारवाई

त्या घाऊक मासेविक्रेत्यांविरोधात कारवाई करण्यात यावी, या मागणीने पुन्हा जोर धरला आहे. सोमवारी सकाळी मासळी मार्केटातील काही विक्रेत्यांनी नगराध्यक्ष बोरकर यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपल्या समस्या मांडल्या.खारीवाडा येथे घाऊक पद्धतीने मासे विक्री होत असल्याने मार्केटात ग्राहक येत नसल्याचा दावा त्यांनी केला. तसेच मार्केटातील काही समस्याही त्यांनी मांडल्या.

Vasco Fish Vendors Protest
Goa Medical College: सरकारचे वैद्यकीय शिक्षणात महत्त्वाचे पाऊल; आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शुल्कात सवलत: मुख्यमंत्र्यांची घोषणा

याप्रकरणी नगराध्यक्ष बोरकर यांनी आश्वासन दिले. खारीवाडा येथील विक्रेत्यांविरोधात वास्को पोलीस, वाहतूक पोलीस व आरटीओ यांनी संयुक्तरित्या कारवाई करावी, यासाठी त्यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. तसेच ही कारवाई मंगळवारपासून सुरू होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com