Vasco Police: पोलीस निरीक्षक निलेश राणे यांना उपअधीक्षक पदी बढती

काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागातर्फे अभिनंदन
Vasco Police
Vasco PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

Vasco Police: वास्को पोलीस निरीक्षक निलेश राणे यांना पोलिस उपअधीक्षक पदी बढती मिळाल्याबद्दल काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाने त्यांचे अभिनंदन केले.

राज्यात निवडणुकीच्या (Goa Assembly Elections 2022) पार्श्वभूमीवर विविध पोलिस स्थानकातील पोलीस उपनिरीक्षक (Sub Inspector), निरीक्षक तसेच अधीक्षकांच्या बढत्या देऊन त्यांची वर्णी इतर ठिकाणी लावण्यात आली आहे. त्यानुसार वास्को पोलीस (Vasco Police) निरीक्षक निलेश राणे यांना ही बढती देऊन त्यांची पोलीस उपअधीक्षक पदी वर्णी लावण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक निलेश राणे यांची ऑक्टोबर 2019 साली वास्को पोलीस निरीक्षक म्हणून वर्णी लावण्यात आली होती.

Vasco Police
FC Goa: वर्चस्व राखूनही गोल नोंदविण्यात अपयश

आजपर्यंत त्यांनी आपल्या या कार्यकाळात चोख कामगिरी बजावून वास्कोत नियमावलीचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उचलून नागरिकांना शिस्तीचे धडे घालून दिले होते. या कामी त्यांना वास्को पोलिस खात्यातील इतर पोलिसांचेही सहकार्य लाभले. त्यांच्या या सहकार्याबद्दल श्री राणे यांनी आपल्या सहकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.

Vasco Police
आज तीन मतदारसंघातून 'या' उमेदवारांनी केले अर्ज दाखल

दरम्यान निलेश राणे यांना पोलिस उपअधीक्षकपदी बढती मिळाल्याबद्दल काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाने वास्को पोलीस स्थानकात जाऊन अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष नजीर खान, दीपक सिंग, साजिद खान, एलविनो आरावजो, बर्नाडो फर्नाडीस, प्रशांत नाईक आदींनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com