आज तीन मतदारसंघातून 'या' उमेदवारांनी केले अर्ज दाखल

28 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे
Candidates applications
Candidates applicationsDainik gomantak
Published on
Updated on

गोवा विधानसभेच्या 14 फेब्रुवारी 2022 रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज सोमवार (दि.24) दुसऱ्या दिवशी मुरगाव तालुक्यातून मुरगाव मतदार संघातून एक, तर दाबोळी मतदार संघातून आणि कुठ्ठाळी मतदार संघातून एक असे तीन अर्ज दाखल करण्यात आले आहेत. माजी मंत्री माविन गुदिन्हो यांनी आज दाबोळी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. तर मुरगाव मतदारसंघातून काँग्रेसचे (Congress) उमेदवार संकल्प आमोणकर तसेच कुठ्ठाळी मतदार संघातून अपक्ष उमेदवार विशाल नाईक यांनी आपला अर्ज दाखल केला. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया शुक्रवार दि. 2121 पासून सुरू झाली. त्यानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी मुरगाव तालुक्यातील चारही मतदार संघातून एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नव्हता. पहिल्या दिवशी पाटी कोरी होती. शनिवार-रविवार सुट्टीचा दिवस होता.

Candidates applications
अमित पालेकरांनी केला नीलेश काब्रालांच्या संपत्तीचा पर्दाफाश

दरम्यान आज अर्ज सादर करण्याचा दुसऱ्या दिवशी उमेदवार यांची उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी असणार असा प्रत्येकाचा समज होता, मात्र आज फक्त तीन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. दाबोळी मतदारसंघातून (Constituency) माजी मंत्री माविन गुदिन्हो यांनी आपला उमेदवारी अर्ज निर्वाचन अधिकारी शर्मिला गांवकर यांच्याकडे दाखल केला. यावेळी त्यांच्या समवेत दाबोळी मतदारसंघातील सरपंच, उपसरपंच, पंच सदस्य, जिल्हा पंचायत सदस्य, नगरसेवक तसेच ज्येष्ठ भाजपा (BJP) कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना माविन गुदिन्हो म्हणाले की दाबोळी मतदार संघातील निष्ठावंत कार्यकर्ते आणि भारतीय जनता पक्षाच्या सहाय्याने यावेळीही आपल्याला विक्रमी मतदान करून पुन्हा एकदा निवडून आणण्यास मदत करणार असे ते म्हणाले. भाजप सरकारच्या सहकार्याने आपण दाबोळी मतदारसंघाचा विकास साधला असताही मतदारांचा कौल आपल्याच बाजूने असणार हे मी खात्रीलायक पणे सांगू शकतो. मुरगाव तालुक्यातील चारही मतदार संघात भाजपचा विजय निश्चित आहे. तसेच या खेपेसहि भाजपच सत्तेवर येईल असा विश्वास दाबोळी मतदार संघाचे भाजपचे उमेदवार माविन गुदिन्हो यांनी व्यक्त केला.

दरम्यान 28 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. त्यानुसार रवींद्र भवन बायणा येथे मामलेदार कार्यालय तसेच उपजिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. रवींद्र भवनच्या मुख्य प्रवेशद्वारात तसेच आवारात पोलिस सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.

Candidates applications
कार्लुस आल्मेदांचा भाजप सरकार विरोधात गौप्यस्फोट

दरम्यान उमेदवारी अर्ज सादर करायला आलेल्या माविन गुदिन्हो यांनी निवडणूक (Election) आयोगाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले. भाजप उमेदवार माविन गुदिन्हो यांनी शेकडो समर्थकांना बरोबर घेऊन दाबोळीतून उमेदवारी अर्ज सादर केला. माविन गुदिन्हो आज आपल्या शेकडो समर्थकांसह बायणा येथे रवींद्र भवन येथे निर्वाचन अधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज सादर केला. काँग्रेसचे उमेदवार संकल्प आमोणकर यांनीही अर्ज भरला. मात्र त्याच्या समर्थकांना रवींद्र भवन आवारात प्रवेश दिला नाही. काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष नजीर खान माजी नगराध्यक्षा भावना भोसले व इतर काँग्रेस समर्थकांना प्रवेश दाराबाहेर ठेवले. पण माविन गुदिन्हो यांच्या शेकडो समर्थकांना रवींद्र भवान आवारात बिनधास्तपणे प्रवेश दिला. याकामी रवींद्र भवनचे अध्यक्ष तथा भाजपचे नेते जयंत जाधव यांनी सहकार्य करत असल्याचे काहींनी निदर्शनास आणून दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com