Vasco Bangalore Special Train: नाताळ आणि नववर्षानिमित्त धावणार विशेष रेल्वेगाड्या, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Christmas New Year Special Train: नाताळ आणि नववर्ष सुट्ट्यांच्या काळात प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनातर्फे वास्को-बंगळुरू दरम्यान खास रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Vasco Bangalore Special Train
Vasco Bangalore Special TrainDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: नाताळ आणि नववर्ष सुट्ट्यांच्या काळात प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनातर्फे वास्को-बंगळुरू दरम्यान खास रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यशवंतपूर जं. वास्को द गामा जं. रेल्वे क्र. ०६५०५ (यशवंतपूर- वास्को-द-गामा) ही विशेष गाडी २५ डिसेंबर (गुरुवार) आणि ३१ डिसेंबर (बुधवार) रोजी पहाटे ००.२० वा. यशवंतपूर येथून रवाना होईल. त्याचदिवशी दु. १.५० वा. वास्को-द-गामा येथे पोहोचेल.

Vasco Bangalore Special Train
Goa Politics: काँग्रेसजनांनी 'आप'मध्ये यावे, अरविंद केजरीवालांची काँग्रेस कार्यकर्त्यांना हाक

ही रेल्वे चिकबनावर, तुमकूर, अर्सकिरी जंक्शन, दावणगिरी, हावेरी, हुबळी जं., धारवाड, अळणावर जं., लोंडा जं., कॅसलरॉक, कुळे, सावर्डे आणि मडगाव जं. येथे थांबेल.

वास्को द गामा-बंगळुरु कॅन्ट ०६५०६ क्रमांकाची (वास्को द गामा – बंगळुरू कॅन्ट.) ही रेल्वे २५ डिसेंबर २०२५ (गुरुवार) आणि ०१ जानेवारी २०२६ (गुरुवार) रोजी सायं. ५ वा. वास्को-द-गामाहून रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वा. बंगळुरू कॅन्टोनमेंट येथे पोहोचेल.

Vasco Bangalore Special Train
Shilpa Shetty Goa Hotel: शिल्पा शेट्टीच्या 'बास्टिन रिव्हेरा' हॉटेलवर पडणार हातोडा? खारफुटीच्या जमिनीत बांधकामास परवानी कशी? कोसंबेंचा सवाल

ही रेल्वे मडगाव जं., सावर्डे, कुळे, कॅसलरॉक, लोंडा जं., अळणावर जं., धारवाड, हुबळी जं., हावेरी, दावणगिरी, अर्सकिरी जं., तुमकूर आणि सर एम. विश्वेश्वरैया टर्मिनल, बंगळुरू येथे थांबेल.

रेल्वे क्रमांक ०६५११/०६५१२ रेल्वे क्रमांक ०६५११/०६५१२ बंगळुरु कॅन्ट -वास्को द गामा बंगळुरू कॅन्ट. ही विशेष एक्सप्रेस रेल्वे क्र. ०६५११ (बंगळुरू वॅ न्ट- वास्को द गामा) ही गाडी २६ डिसें. २०२५ (शुक्रवार) रोजी रात्री ११.३५ वा. बंगळुरू कॅन्टोनमेंट स्थानकावरून रवाना होऊन दुसऱ्या दिवशी दु. १.५० वा. वास्को द गामा येथे पोहोचेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com