Shilpa Shetty Goa Hotel: शिल्पा शेट्टीच्या 'बास्टिन रिव्हेरा' हॉटेलवर पडणार हातोडा? खारफुटीच्या जमिनीत बांधकामास परवानी कशी? कोसंबेंचा सवाल

Shilpa Shetty Bastian Riviera Hotel: प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने मोरजी येथे ‘बास्टियन रिव्हेरा‘ हे हॉटेल उभारले आहे, ती जागा पूर्णतः खारफुटीची आहे.
Shilpa Shetty Bastian Riviera Hotel
Shilpa Shetty Bastian Riviera HotelDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने मोरजी येथे ‘बास्टियन रिव्हेरा‘ हे हॉटेल उभारले आहे, ती जागा पूर्णतः खारफुटीची आहे. आता खारफुटीतील या बांधकामावर सरकार हातोडा मारणार काय, असा सवाल चार्टर्ड अभियंता विधेय कोसंबे यांनी केला आहे.

कोसंबे यांनी ‘गोमन्तक''ला सांगितले की, हडफडेतील बेकायदेशील बर्च बाय रोमियो लेन हा नाईट क्लब पूर्णतः बेकायदेशीर आहे. त्याचप्रकारे शेट्टी यांच्या बास्टियन रिव्हेराबाबत असू शकते. कारण, ज्या सर्व्हे नंबर ४४ मध्ये उभारले आहे, ती जागा पूर्णतः खारफुटीची दाखवण्यात आली आहे.

Shilpa Shetty Bastian Riviera Hotel
Goa Illegal Dance Bars: बेकायदा डान्‍स बारमुळे गोवा बँकाॅकच्या दिशेने, वेश्‍‍या व्‍यवसायाला प्रोत्‍साहन- अरुण पांडे

सॅटेलाईट आराखड्यात ते स्पष्ट दिसते. खारफुटीच्या जमिनीत असल्या बांधकामास परवानी कशी काय मिळाली, त्याशिवाय याठिकाणच्या बांधकामाच्या आराखड्यास परवाना, पाणी-वीज जोडणी, अग्निशामक दलाचा परवाना, अबकारी परवाना, एफडीएचा परवाना कसा काय दिला गेला? हे तपासले जाणार आहे का?असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

नियमांचे उल्लंघन

सर्व्हे नंबर ४४ हा भूखंड पूर्णतः खारफुटीचा आहे आणि त्याठिकाणी ‘सी-१‘ हा नियम लागू होतो. त्यामुळे हा भूभाग नो डेव्हल्पमेंट झोन मध्ये येतो. नैसर्गिक आच्छादन कायम रहावे आणि संरक्षीत रहावे यासाठी जे नियम आहेत, त्या नियमांचे पालन होत नसल्याचे या बांधकामावरून दिसते, असेही कोसंबी यांनी नमूद केले.

Shilpa Shetty Bastian Riviera Hotel
Goa Road Accident: दोन अपघातांमध्ये तिघे ठार, कुठ्ठाळीत दोघे दुचाकीस्वार तर रामनगर येथे कारचालकाचा मृत्यू

आमचे गोवा या फेसबूकवरील पेजवर या क्लबविषयी नेटकऱ्यांनी बऱ्याच प्रतिक्रिया सरकारविरोधात दिल्या गेल्या आहेत. हे हॉटेल पाडायला पाहिजे, बेकायदेशीर कामांना सरकार त्वरित परवानग्या देते, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com