वाळपई भागातील रवळनाथ देवस्थान खुले

रवळनाथ देवस्थानच्या अधिकार पदावरून दहा वर्षे वाद सुरू आहे. 1933 सालच्या नियमानुसार गुरव बांधवांनी देवाची पूजा करायची. व गावकर यांना अन्य अधिकार दिले होते.
valpoi ravalnath temple reopen
valpoi ravalnath temple reopen Dainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई : वाळपई भागातील वेळूस गावचे श्री रवळनाथ देवस्थानचे दरवाजे उघडण्याचा निर्णय वाळपईचे मामलेदार दशरथ गावस यांनी सुनावणीवेळी दिला आहे. पूर्वीप्रमाणे देवस्थानात पूजेचे अधिकार गुरव समाजाला देण्यात आले. या देवस्थानचा वाद गेली दहा वर्षे सुरू आहे. गावकर व गुरव या दोन गटात अधिकारावरून वाद सुरु आहे.

valpoi ravalnath temple reopen
रस्तानाट्यातून जनजागृती करणारे 'कलाकार'

यावर्षी दसरा सणाला तरंगे उचलल्या वरुन वादावादी होऊन मामलेदारांनी मंदिराला टाळे ठोकले होते. दसऱ्यापासून मंदिरातील देवकार्य बंदच होते. त्यावर काल मंगळवारी मामलेदार कार्यालयात सुनावणी झाली. यावेळी दोन्ही गटाचे महाजन उपस्थित होते. यावेळी मामलेदार दशरथ गावस यांनी मंदिर खुले करण्याचा निर्णय देऊन पर्ववत पूजाकार्य सुरू केले जाणार आहे. या निर्णयाचे गुरव बांधवांनी स्वागत केले आहे. तर गावकर मंडळींनी नाराजी व्यक्त केली आहे.

valpoi ravalnath temple reopen
Goa: दिव्यांग असलो तरी स्वयंपूर्ण...

देवस्थानच्या अधिकार पदावरून दहा वर्षे वाद सुरू आहे. 1933 सालच्या नियमानुसार गुरव बांधवांनी देवाची पूजा करायची. व गावकर यांना अन्य अधिकार दिले होते. त्यानुसार मंदिराचे व्यवहार सुरू होते. पण गेली दहा वर्षे गुरव बांधवांनी देवस्थानचे सर्वच अधिकार घेण्याचा प्रयत्न केल्याने गावकर यांनी विरोध केला होता. गावकर यांच्या मते गुरव बांधवांनी केवळ पूजा करावी, असे नियमानुसार म्हणणे आहे. मंदिर चालू रहावे, म्हणूनच आम्ही दहा वर्षे गप्प होतो. पण यावर्षी गुरवांनी दसऱ्याला गावकर यांचीही तरंगे उचलली होती. त्यावरून यावर्षी वाद निर्माण झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com