Valpoi : सत्तरी ही शेतकऱ्यांची भूमी असून आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शेतकऱ्यांना आधुनिकतेची शेतीच्या उत्पादन मालावर प्रक्रिया करण्यासाठी लागणारे यंत्रे व त्याची निर्मिती ब्रह्मकरमळीसारख्या गावात होत असल्याने सत्तरीसाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे प्रतिपादन कृषी तथा आत्माचे अधिकारी किशोर भावे यांनी केले.
ब्रह्मकरमळी येथील ओंकार कृषी यंत्र उद्योगतर्फे संदिप केळकर यांनी बनवलेले बहुपयोगी यंत्राच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर गोवा बागायत संस्थेचे उपाध्यक्ष संतोष केळकर, साहित्यिक डॉ. सोमनाथ कोमारपंत, माजी उपसभापती शंभु भाऊ बांदेकर, नरहरी हळदणकर, नगरगाव पंचायतीच्या सरपंचा संध्या खाडिलकर, ॲड. भालचंद्र भावे, संदीप केळकर, मिलिंद गाडगीळ, गो. रा. ढवळीकर, ॲड. शिवाजी देसाई आदींची उपस्थिती होती.
यंत्र उद्योगाचे मालक सर्वेश संदीप केळकर यांनी या मशीनची माहिती दिली. या मशीनद्वारे मिरी मळता येते, कोकम बियांचे टरफले निघतात, हळद पॉलिश करता येते तसेच ‘फणस बी’ची टरफले सुद्धा निघतात, असे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन ॲड. देसाई तर आभार संदेश केळकर यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी बांधवांची उपस्थिती होती.
काही शेतकऱ्यांच्या मागणीवरून नवीन मल्टीटास्किंग मशीनची निर्मिती केली. गोव्यात जो कृषी माल तयार होतो, त्यावर प्रक्रिया करण्याच्या संबंधी आपल्याला काम करायचे आहे व मशीन निर्मिती करायचे आहे. आमचे सुपारी सोलनी यंत्र व इतर यंत्रे संपूर्ण गोवा तसेच महाराष्ट्र ,केरळ, कर्नाटक, गुजरात अशा अनेक राज्यांत गेली आहेत.
- संदीप केळकर
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.