National Mathematics Day : वळपे विकास हायस्कूलमध्ये गणित दिन उत्साहात साजरा

हायस्कूलचे मुख्याध्यापक नागेश गोसावी, शिक्षक प्रतिनिधी रत्नाकर राव उपस्थित होते.
National Mathematics Day
National Mathematics DayDainik Gomantak
Published on
Updated on

National Mathematics Day At Valpoi: वळपे येथील विकास हायस्कूलमध्ये गणित दिन साजरा करण्यात आला. माजी सरपंच प्रदीप परब यांच्या हस्ते दीप प्रज्वलीत करून कार्यक्रमाचे उद्‍घाटन करण्यात आले. हायस्कूलचे मुख्याध्यापक नागेश गोसावी, शिक्षक प्रतिनिधी रत्नाकर राव उपस्थित होते.

नागेश गोसावी म्हणाले, की काही मुलांना गणित विषयाची भीती वाटते. या विषयाकडे बरेच विद्यार्थी गणित हा किचकट व कठीण विषय या दृष्टीकोनातून बघतात. परंतु या विषयात जर लक्ष घातले तर तो खूप सोपा आहे. त्यामुळे हा विषय आवडीने शिका. यावेळी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा निकाल खालीलप्रमाणे -

National Mathematics Day
National Mathematics Day: गणिताशी अशी करावी मैत्री

पोस्टर तयार करणे : प्रथम - निधी शिरोडकर, द्वितीय - तन्मय पालेकर, तृतीय - सिया शेटकर, उत्तेजनार्थ - साक्षी पाटील, रोहित नाईक. लेखी गणित प्रश्नमंजुषा ः प्रथम - तन्मय खर्बे, द्वितीय - आर्यन कवठणकर, तृतीय - निखिल साळकर, उत्तेजनार्थ - भूमिका पार्सेकर, रिचा रामजी. प्रतिकृती तयार करणे : प्रथम - ज्ञानदीप अकादमी हायस्कूल पूर्वा, द्वितीय - विकास हायस्कूल वळपे, तृतीय - श्री भगवती हायस्कूल पेडणे, उत्तेजनार्थ - कमलेश्वर हायस्कूल पेठेचावाडा, पार्से हायस्कूल पार्से.

National Mathematics Day
National Mathematics Day: श्रीनिवास रामानुजन...अनेक प्रमेयांचे जनक

बक्षीस वितरण कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक रजनीकांत गावडे, प्रसिद्ध चित्रकार पी. ए. सूर्यवंशी, पालक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष उल्हास देऊलकर, भगवान म्हामल, नागेश गोसावी व रत्नाकर राव उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com