National Mathematics Day 2021: भारतात दरवर्षी 22 डिसेंबर रोजी गणित दिवस साजरा केला जातो. महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन (Srinivasa Ramanujan) यांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस साजरा केला जातो. रामानुजन यांचे वयाच्या 33 व्या वर्षी निधन झाले. या तरुण वयापर्यंत त्यांनी जवळपास 3500 गणिताची सूत्रे जगाला दिली होती. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी श्रीनिवास रामानुजन यांच्या सन्मानार्थ हा दिवस गणित दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती.
रामानुजन यांचा जन्म 1887 साली तामिळनाडूमध्ये झाला. त्यांनी लहान वयातच गणितात ऐतिहासिक काम करायला सुरुवात केली. जेव्हा ते 12 वर्षांचे होते, तेव्हा त्यांनी त्रिकोणमितीमध्ये प्रभुत्व मिळवले होते आणि स्वतःहून अनेक प्रमेये विकसित केली होती. त्यांना गणिताची एवढी आवड होती की, गणितात पूर्ण गुण मिळायचे मात्र इतर विषयात नापास व्हायचे.
गणितातील योगदानाबद्दल त्यांना भारत सरकारकडून अनेक सन्मान मिळाले आणि गणिताशी संबंधित अनेक समाजांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या पदांवर काम केले. विशेष म्हणजे त्यांनी गणित शिकण्यासाठी कोणतेही विशेष प्रशिक्षण घेतले नाही. रामानुजन यांचा पहिला शोधनिबंध “सम प्रॉपर्टीज ऑफ बर्नौली नंबर्स” जर्नल ऑफ इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीमध्ये प्रकाशित झाला. 26 एप्रिल 1920 रोजी वयाच्या 33 व्या वर्षी क्षयरोगामुळे त्यांचे निधन झाले.
रॉबर्ट कैनिगल यांनी रामानुजन यांचे चरित्र लिहिले 'द मॅन हू नू इन्फिनिटी: अ लाइफ ऑफ द जिनियस रामानुजन'. 2015 मध्ये त्याच्यावर 'द मॅन हू नो इन्फिनिटी' हा चित्रपटही बनला होता. देव पटेल यांनी या चित्रपटात रामानुजन यांची भूमिका साकारली होती. हा चित्रपट रॉबर्ट कनिगल यांच्या रामानुजन यांच्या चरित्रावर आधारित होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.