Vagator: वागातोर भागात अजून एका नाइट क्लबची भर! एका भागीदारावर कथित आरोप

Vagator Club: वागातोर येथील मुख्य रस्त्यावर बुधवारी (२४ डिसेंबर) नाताळ सणाच्या पूर्वसंध्येला ‘हॅमरझ मॅकारेना’ या नवीन नाइट क्लबचे लोकार्पण होत असल्याने किनारी पट्ट्यात हा चर्चेचा विषय बनला आहे.
Vagator Club
Vagator ClubDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: बर्च क्लब दुर्घटनेनंतर सरकारने किनारी भागांत कार्यरत सर्व क्लबची संयुक्त अंमलबजावणी देखरेख समितीकडून संबंधित आस्थापनांकडे अग्निसुरक्षा ना-हरकत प्रमाणपत्रे, संरचनात्मक प्रमाणपत्रे व इतर सुरक्षा मंजुरी तसेच नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक तालुक्यांमध्ये व्यापक तपासणी सुरू केली आहे.

याच पार्श्वभूमीवर, वागातोर येथील मुख्य रस्त्यावर बुधवारी (२४ डिसेंबर) नाताळ सणाच्या पूर्वसंध्येला ‘हॅमरझ मॅकारेना’ या नवीन नाइट क्लबचे लोकार्पण होत असल्याने किनारी पट्ट्यात हा चर्चेचा विषय बनला आहे. याच हॅमरझ नावाने बागा परिसरात क्लब याआधीच कार्यरत आहे. आता वागातोरमध्ये ‘हॅमरझ मॅकारेना’ नावाने नामकरण केलेल्या नवीन क्लबची भर पडली आहे.

विशेष म्हणजे, तिघे बिगर-गोमंतकीय या क्लबचे भागीदार असून, क्लबचा चौथा पार्टनर हा स्थानिक गोमंतकीय असल्याची चर्चा आहे. यातील एक भागीदार (सीईओ) हा गेली १२ वर्षे, फरार असलेल्या १७ कोटींच्या बँक फसवणूक प्रकरणातील मुख्य संशयित आहे. ज्याला आठवड्याभरापूर्वीच गोव्यात केंद्रीय तपास यंत्रणेने पकडले होते. संशयित बांबोळी परिसरात बनावट नाव धारण करून राहत होता. १८ डिसेंबरला बांबोळी येथे छापा टाकून त्यास अटक केली होती.

Vagator Club
Goa ZP Election Result: विरोधकांच्या फुटींमुळे भाजपचे परत एकदा ‘बल्ले बल्ले’! विरोधकांचे हवेत उडणारे पतंग जमिनीवर आपटले..

हडफडे येथे बर्च बाय रोमिओ लेन या क्लबमध्ये भीषण अग्निकांड घडले होते. त्यानंतर, सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली व नंतर सरकारच्या निर्देशानंतर संयुक्त अंमलबजावणी देखरेख समितीकडून प्रत्येक किनारी भागांत अशा रेस्टॉरंट्स व क्लबच्या पाहणीस वेग आला होता. समितीकडून उत्तर व दक्षिणेत, अशी आस्थापने सील देखील केली होती.

Vagator Club
Goa Politics: 'फ्रेंडली फाईट' ही संकल्पनाच मला मान्य नाही; 2027 साठी काँग्रेसचा आक्रमक पवित्रा, आलेमाव यांचे मोठे वक्तव्य

जाहिरात पोस्टरबाजी!

‘हॅमरझ मॅकारेना’चे गेल्या १२ डिसेंबरला लाँच होणार होता. मात्र, काही कारणास्तव हा सोहळा लांबणीवर पडला व बुधवारी नाताळ सणाच्या पूर्वसंध्येला रात्री ९ वाजता झाला. या क्लबची थिम ‘डार्क ऑबसेशन’ म्हणजे ‘गडद वेड’ अशी आहे.

या लाँच कार्यक्रमानिमित्त, देशातील नामांकित १२ डीजेचे शो वाजणार आहेत. २४ डिसेंबर २०२५ ते ४ जानेवारी २०२५ पर्यंत हा लाँच सोहळा चालेल. सोशल मीडियावर याची जाहिरातबाजी मोठ्याने सुरू असून, हणजूण परिसरात या क्लबची जाहिरात पोस्टरबाजी अधिक प्रमाणात दिसून येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com