Durga Puja
Durga Puja Dainik Gomantak

Bicholim: 'आई तुझ्या ग चरणी, आभाळ धरणी येऊन विसावले'! UP तील महिलाचे देवी पूजन; गोव्यात भाड्याच्या खोलीत जोपासली परंपरा

Durga Puja 2025 Goa: एका महिलेने आदीशक्ती दुर्गामाता देवीच्या मूर्तीचे पुजन केले आहे. या पुजनाीत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे जिथे बिऱ्हाड तिथे देवी पूजन ही परंपरा या महिलेने जोपासून ठेवली आहे.
Published on

डिचोली: गोविंदनगर-सर्वण येथे उत्तरप्रदेशमधील एका महिलेने आदीशक्ती दुर्गामाता देवीच्या मूर्तीचे पुजन केले आहे. या पुजनाीत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे जिथे बिऱ्हाड तिथे देवी पूजन ही परंपरा या महिलेने जोपासून ठेवली आहे.

यंदा ती राहत असलेल्या गोविंदनगर येथील भाड्याच्या खोलीत मूर्ती पूजन केले आहे. रानी सिंग असे या महिलेचे नाव आहे. रानी सिंग ही महिला गेल्या बारा वर्षांपासून आपल्या कुटुंबासमवेत डिचोलीत वास्तव्य करुन आहेत.

Durga Puja
Navratri Special: कामालाच आनंद मानणारी, आव्हानांना सामोरे जाण्याची ऊर्जा देणारी 'महिला उद्योजिका'; दुर्गेचे आधुनिक रुप

तीचे पती नंदू सिंग हे फॅब्रिकेशनचे काम करतात. रानी सिंग या बारा वर्षांपासून गोव्यात वास्तव्य करुन असल्या तरी गेल्या चार वर्षांपासून त्या नवरात्री उत्सव काळात भक्तीभावाने दुर्गा देवीचे पूजन करीत आल्या आहेत. स्वतःचे घर नसल्याने ज्याठिकाणी भाड्याच्या घरात राहतात, त्याठिकाणी नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून त्या भक्तीभावाने दुर्गा मातेच्या मूर्तीचे पूजन करतात.

Durga Puja
Navratri Special: एका घराच्या गच्चीवर सुरु केलेले काम, पोचले हजारो मुलांपर्यंत! ‘रोबोटिक्स’ची ‘अ,आ,ई..’ शिकवणारी आधुनिक दुर्गा

विसर्जन मिरवणूक

दुर्गा पुजनानिमित्त रोज आरती व अन्य धार्मिक विधी होतात. बुधवारी कुमारीका पुजन सोहळा झाला. गुरुवारीमिरवणुकीसह वाठादेव येथील नदीत मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. दुर्गा माता ही आदीशक्ती देवता आहेत. या देवीचे पुजन म्हणजे माझ्यासाठी भाग्य आणि आनंदाचा क्षण आहे, असे रानी सिंग यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com