Utpal Parrikar Demands Transparent Hiring : ..तरच नोकरी घोटाळे टळतील! 'आयोग भरती' आणि 'कॅश फॉर जॉब'बाबत पर्रीकर काय म्हणाले वाचा

Staff Selection Commission Recruitment : उमेदवारांना गुणवत्ता यादी पाहण्याची सुविधा नसेल तर घोटाळ्याची शक्यता आहे, शिवाय त्यात कोणाचीही लुडबूड झाली नाहीतरच प्रक्रिया पारदर्शी होईल, असे मत उत्पल पर्रीकर यांनी व्यक्त केले.
Utpal Parrikar
Utpal ParrikarDainik Gomantak
Published on
Updated on

Utpal Parrikar on cash for job scam Staff Selection Commission role in Goa recruitment

Panaji News : उमेदवारांना गुणवत्ता यादी पाहण्याची सुविधा नसेल तर घोटाळ्याची शक्यता आहे, शिवाय त्यात कोणाचीही लुडबूड झाली नाहीतरच प्रक्रिया पारदर्शी होईल, असे मत उत्पल पर्रीकर यांनी व्यक्त केले. राज्यात ‘कॅश फॉर जॉब'' प्रकरण सध्या गाजत आहे. त्यामुळे सरकारी नोकऱ्यांबाबत संशय निर्माण होत आहे, सरकारने कर्मचारी निवड आयोगामार्फत पदे भरणार असल्याचे जाहीर केले आहे, त्या पार्श्‍वभूमीवर उत्पल पर्रीकर यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

पत्रकारांना दिलेल्या माहितीत त्यांनी सांगितले की, आयोगामार्फत भरती प्रक्रिया पारदर्शक आणि खुल्या पद्धतीने करावी लागेल. नोकऱ्या देताना उमेदवारांची गुणवत्ता लक्षात घेणे आवश्यक आहे. परीक्षा झाल्यानंतर गुणवत्ता यादी तत्काळ जनतेसाठी खुली व्हायला हवी, तरच नोकरी घोटाळे टळतील. अन्यथा सध्या घडलेल्या घोटाळ्यांची पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे.

बारावीची परीक्षा ज्यापद्धतीने घेतल्या जातात, त्याप्रमाणे उत्तर पत्रिका आणि गुणवत्ता यादी खुली करावी. जर एखाद्या उमेदवारास नोकरी मिळाली नाही, तर त्याला त्याची उत्तर पत्रिका आणि गुणवत्ता यादी पाहण्यास मिळायला हवी. जर नोकरी प्रक्रिया पारदर्शक झाली तरच सरकारी पातळीवरील घोटाळे टाळता येणे शक्य असल्याचे त्यांनी नमूद केले.

Utpal Parrikar
Sunburn Festival: 'न्यायालयाच्या निर्णयानंतर आमची भूमिका होणार स्पष्ट'; आमदार आर्लेकर ‘सनबर्न’ विरोधाबाबत ठाम

‘कॅश फॉर जॉब’मध्ये सहभाग नाही, तर चौकशीला का भिता? वळवईकर

भाजपच्या नेत्यांचा ‘कॅश फॉर जॉब''मध्ये काहीच सहभाग नसेल तर सरकार कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास का भीत आहे. ज्या अर्थी उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधिशांकरवी या प्रकरणाची चौकशीची मागणी विरोधक करीत आहेत, ती भाजप सरकार का मान्य करीत नाही, असा सवाल तृणमूल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष समील वळवईकर यांनी केला आहे.

Utpal Parrikar
Navy Job Scam: नौदल तळावर काम देण्‍याचे आमिष दाखवून 7 लाखांना फसवले; 'त्या' महिलेविरोधात 22 तक्रारी दाखल

वळईकर यांनी प्रसार माध्यम प्रतिनिधींना सांगितले की, राज्यात जमीन हडप प्रकरणानंतर ‘कॅश फॉर जॉब'' मोठा घोटाळा बाहेर आला. विरोधकांनी याविरोधात सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्याने विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहेत. ‘कॅश फॉर जॉब'' प्रकरणात भाजप सरकारला जर त्यांचा कोणताही नेता त्यात नसल्याचे दिसत आहे तर मग ते कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास का भीत आहे, असा सवाल वळवईकर यांनी पुनःश्च उपस्थित केला.

विरोधी आमदाराने तक्रार कधी केली आणि तो अश्लिल व्हिडिओ व्हायरल कसा झाला यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, पोलिसांच्या ताब्यात असलेला व्हिडिओतील क्लिप कोणी व्हायरल केली. यामागून विरोधकांवर दबाव आणण्याचाच सरकारचा प्रयत्न दिसतो, असेही त्यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com