Navy Job Scam: नौदल तळावर काम देण्‍याचे आमिष दाखवून 7 लाखांना फसवले; 'त्या' महिलेविरोधात 22 तक्रारी दाखल

Job frauds reported in Goa 2024 : कारवार येथील सी बर्ड नौदल तळावर काम देण्‍याचे आमिष दाखवून बेकार युवकांना लुटण्‍याच्‍या दोन घटनांचे मडगाव आणि मायणा-कुडतरी पाेलिस स्‍थानकांत गुन्‍हे दाखल झालेले असताना याच प्रकारची आणखी एक तक्रार सचित नाईक या युवकाने मडगाव पोलिस स्‍थानकावर दिली आहे.
Cash For Job Scam
Cash For Job ScamDainik Gomantak
Published on
Updated on

Job scam at Sea Bird Karwar Naval Base

मडगाव: कारवार येथील सी बर्ड नौदल तळावर काम देण्‍याचे आमिष दाखवून बेकार युवकांना लुटण्‍याच्‍या दोन घटनांचे मडगाव आणि मायणा-कुडतरी पाेलिस स्‍थानकांत गुन्‍हे दाखल झालेले असताना याच प्रकारची आणखी एक तक्रार सचित नाईक या युवकाने मडगाव पोलिस स्‍थानकावर दिली आहे. पौर्णिमा सतीश कोळंबकर या नावाच्‍या बाईने आपल्‍याला ७ लाख रुपयांचा गंडा घातल्‍याचे या तक्रारीत म्‍हटले आहे.

दवर्ली-दिकरपाल येथे राहाणाऱ्या सचित नाईक याने सांगितले की, २०१७ मध्‍ये आपण पौर्णिमा कोळंबकर हिच्‍या संपर्कात आलो. ‘सी बर्ड’मध्‍ये नोकऱ्या उपलब्‍ध आहेत असे सांगून तिने आपल्‍याकडून फॉर्म लिहून घेतले. आपण ही नाेकरी मिळणार या आशेने तिला चेकने ३.५० लाख रुपये तर राहिलेले ३.५० लाख रुपये रोख दिले.

Cash For Job Scam
Sunburn Festival: 'न्यायालयाच्या निर्णयानंतर आमची भूमिका होणार स्पष्ट'; आमदार आर्लेकर ‘सनबर्न’ विरोधाबाबत ठाम

मात्र, शेवटपर्यंत आपल्‍याला त्‍या महिलेने तंगवत ठेवले. मागच्‍या ऑगस्‍ट महिन्‍यात आपण हे पैसे मागण्‍यासाठी या महिलेच्‍या कारवार येथील घरी गेलो असता तेथून आपल्‍याला हाकलून लावण्‍यात आले. यासंदर्भात आपण कारवार पोलिस स्‍थानकात तक्रार देण्‍याचा प्रयत्‍न केला; पण जिथे पैशांचा व्‍यवहार झाला तिथे तुमची तक्रार दाखल करा असे आपल्‍याला सांगण्‍यात आले. कारवारातही या महिलेच्‍या विराेधात अशाचप्रकारे २२ तक्रारी दाखल झाल्‍या आहेत.

Cash For Job Scam
Goa AAP: ..तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही! Cash For Job वरुन 'आप' कार्याध्यक्षांचा इशारा

‘एफआयआर’ नोंद नाही

आपण तीन दिवसांपूर्वी याप्रकरणी मडगाव पोलिसांत तक्रार दिली आहे; पण मडगाव पोलिसांनी अजूनही याबाबतीत‘एफआयआर’ नोंद केलेला नाही, असे सचित याने सांगितले. यावेळी त्‍याच्‍याबरोबर राहुल शानभाग हे उपस्‍थित होते. मडगाव पोलिसांनी ही तक्रार त्‍वरित नोंद करावी, अशी मागणी त्‍यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com