Goa Politics: पणजीवासीयांवर प्रेम करणारे नेतृत्व हवे! उत्पल यांची बाबूश यांच्यावर टीका; दामू नाईक, तानावडेंनी रंग लावल्याने चर्चा

Panaji politics: पणजीतील गुलालोत्सवाच्या दिवशी उत्पल पर्रीकर यांनी पुन्हा एकदा आमदार बाबूश मोन्सेरात यांच्यावर नाव न घेता अप्रत्यक्षरित्या टीका करण्याची संधी सोडलेली नाही.
Utpal Parrikar, Damu Naik
Utpal Parrikar, Damu Naik Dainik Gomantak
Published on
Updated on

BJP Goa politics

पणजी: पणजीतील गुलालोत्सवाच्या दिवशी उत्पल पर्रीकर यांनी पुन्हा एकदा आमदार बाबूश मोन्सेरात यांच्यावर नाव न घेता अप्रत्यक्षरित्या टीका करण्याची संधी सोडलेली नाही. पणजीतील नागरिकांवर प्रेम करणारे नेतृत्व हवे, असे सांगत उत्पल यांनी सध्याच्या पणजीच्या नेतृत्वाविषयी शंका उपस्थिती केली आहे.

दरम्यान, आझाद मैदानावर उत्पल पर्रीकर यांना भाजपचे आजी प्रदेशाध्यक्ष दामू नाईक आणि माजी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी रंग लावल्याने आता राजकीय तर्कवितर्काला उधाण आले आहे.

पणजीतील गुलालोत्सवाला सुरुवात होण्यापूर्वी उत्पल यांनी महालक्ष्मी मंदिरात हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, मंत्री बाबूश यांची अनुपस्थिती लक्षात घेत उत्पल यांनी ते सर्वत्र अनुपस्थित असतात, अगदी अधिकृत सरकारी कार्यक्रमांना ते नसतात.

Utpal Parrikar, Damu Naik
Utpal Parrikar Demands Transparent Hiring : ..तरच नोकरी घोटाळे टळतील! 'आयोग भरती' आणि 'कॅश फॉर जॉब'बाबत पर्रीकर काय म्हणाले वाचा

पणजीकरांवर प्रेम करणारे नेतृत्व हवे, फक्त नफा मिळवू पाहणारे नेतृत्व नाही. पणजीत काय चालले आहे, हेच कळत नाही. मडकईकरांच्या आरोपानंतर उत्पल यांनी स्थानिक नेतृत्वाकडे बोट दाखवले. नंतर गुलालोत्सवाचे निमित्त साधत उत्पल यांनी पुन्हा टीकेची संधी सोडली नाही.

Utpal Parrikar, Damu Naik
Vijay Sardesai Remember Parrikar: विरोधक ते सरकारमधील सोबती; पर्रीकरांना पाठिंबा का दिला? विजय सरदेसाईंनी सांगितले कारण

धेंपेंकडून महालक्ष्‍मीची पूजा

पणजीतील गुलालोत्सवासाठी महालक्ष्मी मंदिरातून नारळ नेला जातो आणि तो पुढे आझाद मैदानावर वाढवून कार्यक्रमाला सुरुवात होती. तत्पूर्वी महालक्ष्मी मंदिरात आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पणजी शिमगोत्सव समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे आणि त्यांच्या पत्नी पल्लवी धेंपे, तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, शिगमोत्सव समितीचे कार्याध्यक्ष मंगलदास नाईक व इतर सदस्यांनी पूजा केली. त्यानंतर सवाद्य मिरवणुकीने नारळ आझाद मैदानावर आणण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com