Vijay Sardesai Remember Parrikar: विरोधक ते सरकारमधील सोबती; पर्रीकरांना पाठिंबा का दिला? विजय सरदेसाईंनी सांगितले कारण

Manohar Parrikar Birth Anniversary: अपक्ष पक्षांच्या आमदारांना बरोबर घेऊन पर्रीकरांनी जरूर सरकार घडविले असेल. पण आता भाजपने ज्याप्रमाणे ‘होलसेल’ पक्षांतरे घडवून आणली, तशा प्रकारांना त्यांनी कधीच उत्तेजन दिले नाही.
Vijai Sardesai,  Manohar Parrikar
Vijai Sardesai, Manohar ParrikarX
Published on
Updated on

पणजी: दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा मला आवडणारा सर्वांत चांगला गुण म्हणजे शुद्ध राजनीतीवर त्यांचा असलेला विश्‍‍वास. सुरवातीला पर्रीकर यांचा मी विरोधक होतो. त्यांच्यावर मी कित्येकदा जहरी टीकाही केली. पण त्यांच्या शेवटच्या दिवसांत मी त्यांना बराच जवळ आलो होतो. याचे कारण म्हणजे गोव्याप्रति त्यांचे असलेले निस्सीम प्रेम. त्यामुळेच पर्रीकरांनी अतिरिक्त कोळसा हाताळणीला विरोध केला होता.

आमच्यासारख्या अपक्ष पक्षांच्या आमदारांना बरोबर घेऊन पर्रीकरांनी जरूर सरकार घडविले असेल. पण आता भाजपने ज्याप्रमाणे ‘होलसेल’ पक्षांतरे घडवून आणली, तशा प्रकारांना त्यांनी कधीच उत्तेजन दिले नाही. आज ते हयात असते तर त्यांनी तसे केलेच नसते. चांगले शिकलेले लोक राजकारणात यावेत आणि त्यांनी चांगले राजकारण करावे असे पर्रीकर यांना नेहमीच वाटत असे. त्यासाठीच आम्ही त्यांना साथ दिली होती आणि ही साथ न सोडण्याचे वचनही दिले होते. पण ते गेल्यावर सरकारमध्ये आमचे राहणे ही एक चूकच होती असे आता वाटते.

Vijai Sardesai,  Manohar Parrikar
Manohar Parrikar Life Journey : उत्तमा आत्मना ख्याताः ! RSS ते गोव्याचे मुख्यमंत्री, पर्रीकरांचा जीवनप्रवास

आजचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे जरी ‘पर्रीकर आपले आदर्श’ असे म्हणत असले तरी त्यांची परंपरा त्‍यांनी काही पुढे सुरू ठेवली नाही असेच म्हणावे लागेल. आजचा सरकारातील भ्रष्टाचार पाहिल्यास ‘पर्रीकर यांच्या स्वप्नातील गोवा’ हे सरकार खरेच स्थापन करणार का, की केवळ एक दिवस त्यांच्या फोटोला हार अर्पण करून नंतर आपले गोरखधंदे चालूच ठेवणार? असा प्रश्‍‍न पडतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

vijai sardesai warns goa govt
mla vijai sardesai slams goa govt
MLA Vijai Sardesai Court Warning
Manohar Parrikar Death Anniversary
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com